Farmer Success Story : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीतून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत आहे. यामुळे महाराष्ट्रात शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. परिणामी आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या ही एक चिंताजनक बाब बनली आहे.
मात्र शेतकरी बांधवांनी जर काळाच्या ओखात बदल केला तर शेतीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. विदर्भातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील हे दाखवून दिले आहे.
एकेकाळी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अंकित राऊत यांनी काळाच्या उगाच शेतीमध्ये बदल करत सिताफळ या फळबाग पिकातून लाखोंच उत्पन्न कमावून दाखवले आहे. यामुळे सध्या या माजी शिक्षकाची चांगली चर्चा रंगली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरच्या झूनकी येथील अंकित राऊत हे जवळपास पाच वर्ष एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, अंकित यांना अगदी लहानपणापासून शेतीची आवड असल्याने त्यांनी खाजगी शाळेतल्या शिक्षकाच्या नोकरीला राजीनामा दिला नोकरीवर तुळशीपत्र ठेवले आणि शेती व्यवसायाकडे वळले.
शेती व्यवसायात पदार्पण केल्यानंतर अंकित यांनी शेतीमध्ये पारंपारिक पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाले. पाण्याची उपलब्धता त्यांच्याकडे असताना देखील शेतीतून कवडीमोल उत्पन्न मिळत असल्याने अंकित थोडेसे नाराज झाले. शेतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि फळबाग लागवड करण्याचे ठरवले.
फळबागेत त्यांनी संत्रा मोसंबी आणि सीताफळाची लागवड केली. 2018 मध्ये त्यांनी आपल्या सव्वा दोन एकर क्षेत्रात सिताफळाचे 850 झाडे लावली. यापैकी जवळपास साडेसहाशे झाडांना आता सिताफळ लागले असून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अंकित यानी सीताफळ बागेत आंतरपीक देखील घेतले यामुळे लागवडीसाठी झालेला खर्च भरून काढण्यास मदत झाली.
अंकित यांनी उत्पादित केलेल सिताफळ चांगल्या क्वालिटीचे असल्याने त्यांना फोनवर ऑर्डर मिळत आहेत. उर्वरित माल ते बाजार समितीत विक्री करत आहेत. अंकित यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी खर्च वजा केला असता त्यांना सव्वादोन लाखांची कमाई आहे.
सव्वा दोन एकरात सव्वा दोन लाखांची कमाई निश्चितच अंकित यांच्या कष्टाची अधोरेखन करत आहे. अंकित यांच्या मते आता सिताफळाच्या बागेतून दीडपट दरवर्षी उत्पादन वाढणार आहे. निश्चितच युवा शेतकऱ्याचा शेती मधला हा चमत्कार इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे.