कृषी

याला म्हणावं यश ! अ’शिक्षित’ महिलांनी सुरू केल पशुपालन ; आज दूध विक्रीतून कमावताय वार्षिक अडीच कोटी

Farmer Success Story : आपल्या देशात शेती हा एक मुख्य व्यवसाय. मात्र असे असले तरी शेतीमध्ये सातत्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे शेतकरी बांधवच शेती नको रे बाबा असा ओरड करू लागले आहेत. यावर उपाय म्हणून जाणकार लोक शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देतात.

केवळ शेतीवर विसंबून न राहता शेतीपूरक व्यवसायाची सांगड घातली पाहिजे असं सांगतात. निश्चित शेती पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येऊ शकते. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाणामधून असंच एक उदाहरण समोर येत आहे.

तालुक्यातील गोंदून येथील काही अशिक्षित महिलांच्या बचत गटाने दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमावण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या या महिला गटाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा पाहायला मिळत आहे.

खरं पाहता 27 वर्षांपूर्वी जिवली साधूराम भोये या महिलेने तेरा महिलांना सोबत घेतलं महालक्ष्मी बचत गटाची स्थापना केली. विशेष म्हणजे या महिला बचत गटान सुरुवातीला दरमहा दहा रुपये बचत करण्यास सुरवात केली. पुढे महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाच्या संपर्कात हा बचत गटाला.

या मंडळांने पंजाब नॅशनल बँक उंबरठाण येथून या महिला बचत गटाला अडीच लाख रुपयांचे कर्ज काढून दिले. या पैशातून या महिलांनी तेरा म्हशी खरेदी केल्या. तेथून या दुग्ध व्यवसायाची सुरुवात झाली. आजच्या घडीला या गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला हा दुग्ध व्यवसाय एवढा मोठा बनला आहे की आता दररोज अडीच हजार लिटर दुधाचे संकलन याच्या माध्यमातून केल जात.

या व्यवसायातून हा गट वर्षाकाठी दोन कोटी 52 लाखांची उलाढाल करत आहे. विशेष म्हणजे या गटातील सर्व महिला या निरक्षर आहेत. यामुळे त्यांनी एक दहावी शिकलेला मनोहर भोये नामक तरुणाला गटाच्या सचिव पदी विराजमान केले असून सर्व आर्थिक व्यवहार हा तरुण पाहतो.

या बचत गटाच्या डेरी मध्ये संकलन होणार अडीच हजार लिटर दूध डांग जिल्ह्यातील वघई येथील शीतकेंद्रात त्या ठिकाणी दुधावर प्रक्रिया केली जाते आणि पुढे अलीपुर गुजरात येथे पाठवल जात. या बचत गटाच्या अध्यक्षा जिवली भोये सांगतात की त्यांच्या बचत गटाला शासनाकडून कोणताच अनुदान किंवा प्रोत्साहन मिळत नाही.

जर शासनाने त्यांना प्रोत्साहित केलं तर हा बचत गट अजून मोठा होईल अशा त्यांना आहे. निश्चितच अशिक्षित असून देखील शिक्षित लोकांना लाजवेल असं काम या महिलांनी करून दाखवलं आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts