कृषी

Kharif Season : शेतकरी बॅकफूटवर..! शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्याला चिंता

Kharif Season : खरीप हंगाम उंबरठ्यावर आला आहे. सोयाबीन, कांदा कापूस, या नगदी पिकांबरोबर शेतीमालाच्या कुठलाही पिकाला बाजारपेठेत भाव नाही.

खरीप हंगामातील शेती मशागत करण्यापासूनच आर्थिक अडचणी समोर असतानाच रासायनिक खतांची भरमसाठ दरवाढ शेतकऱ्यांना दुष्कळांत तेरावा महिना असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कोविड पासून शेती व्यवसाय जास्त प्रमाणात तोट्यात गेला आहे. त्याची झळ आज ही शेतकरी वर्ग सहन करत आहे. कोविड नंतर प्रथमच सोयाबीन व कापूस या हुकमी पिकांनी अल्प काळासाठी दहा हजार रुपयांचा क्विंटलचा टप्पा पार केला. प्रथमच कष्टाचे फळ मिळाल्याने शेतकऱ्यांनाच आनंद गगनात मावेना.

पर्यायी सोयाबीन व कापूस पिकांचा पेरा वाढत गेला. त्यानंतर मात्र या पिकांना बाजारभावाची उतरती कळा लागली. तीआज पर्यंत टिकून आहे. एकीकडे कोणत्याच शेती मालाला भाव नाही व दुसरीकडे रासायनिक खतांच्या किंमतीत दरवर्षी वाढ हा विरोधाभास शेतकऱ्यांना चक्रावून टाकणारा आहे.

शेतकरी बॅकफूटवर..!

आजमितीस निवडणूक व प्रचाराचा धडाका चालू आहे. वैयक्तिक आरोप- प्रत्यारोप चालू असून, शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव यावर मात्र कुठेही चर्चा होताना दिसत नसल्याने शेतकरी बॅकफूटवर पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts