कृषी

जमिनीत ओल असल्याने शेतकऱ्यांचे चारा पिकांना प्राधान्य

Agricultural News : गेल्या चार दिवसांपासून नगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने बहुतेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले; मात्र पेरणीलायक पुरेशी ओल निर्माण झाल्याने शेतकरी ज्वारी,

हरभरा पेरणीसाठी सरसावले असून, चारा पिकांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अवकाळीने कही खुशी, कही गम अशी परिस्थिती झाली आहे.

भर पावसाळ्यात गुंगारा देणारा पाऊस खरीप हंगाम संपला तरी परत आला नाही. त्यामुळे खरिप व रब्बीच्या पिकांना त्यांचा मोठा फटका बसून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला.

काही शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात असलेले पाणी वापरून पिके जिवंत ठेवले असले तरी उत्पादन मात्र काही मिळाले नाही. शिल्लक राहिलेल्या पिकावर अवकाळी पावसाचा मोठा मारा झाल्याने

बहुतेक शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली आणी डोळ्यांत पाणी आले; मात्र अनेक ठिकाणी ह्या अवकाळी पावसाचा फायदाही झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी चारा पिकास प्राधान्य देत ज्वारी,

हरभरा पिकांच्या पेरणीकडे कल वळवला आहे. कारण महत्त्वाचा चारा प्रश्न हिवाळ्यातच बिकट झाला असल्याने, पुढील काळात जर या पिकाचा आधार झाला तर पशुधन वाचवण्यास मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पडलेला हा अवकाळी पाऊस काही शेतकऱ्यांना मारक तर काहींसाठी तारक ठरणार आहे.

ज्वारी, हरभऱ्याचा पेरा वाढणार

कमी पाण्यात येणारे पीक म्हणून ज्वारी, हरभरा हे पीक आहे. त्यात किमान हरभऱ्याचा भुसा व ज्वारीची वैरण ही पौष्टिक असल्याने किमान पशुधनास याचा भविष्यात चागला आधार मिळेल. या हेतूने व पुरेशी ओल असल्याने याची पेरणी जास्त होणार असल्याचे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दोन दिवसांत पेरणीसाठी मागणी.

रब्बी हंगाम चालू झाल्यानंतर अवकाळीमुळे प्रथमच पेरणीसाठी शेतकरी वळले असून, ज्वारीच्या पेरणीसाठी मागणी वाढत असून दोन दिवसांत १० एकर पेरणी झाली आहे.- बच्चू जोशी, ट्रॅक्टर व्यावसायिक

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts