Agricultural News : शेतकऱ्यांची आर्थिक जुळवाजुळवीची चिंता अजूनही मिटेना. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या धान्यास मिळणारा कमी बाजारभाव. आता नुकतेच नवे सोयाबीन मार्केटमध्ये दाखल झाले आहे. परंतु नव्या सोयाबीनला केवळ साडेचार हजारांचा भाव मिळात आहे.
नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येताच, बाजारभाव गडगडतात हा पूर्वानुभव आहे. परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचा पेरा फार कमी झाला. त्यामुळे सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळेल असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात साडेचार हजरांचा भाव सोयाबीनला मिळत आहे. हा बाजारभाव वाढण्याची शक्यताही कमीच असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जे नैसर्गिक वातावरण आहे त्यानुसार सध्या शेतीत अनेक प्रयोग करावे लागत. अनके फवारण्या कराव्या लागतात. खताचा माराही आलाच. म्हणजेच अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी शेतकरी भरमसाठ खर्च करतात. याच्या किमतीही प्रचंड वाढलेल्या आहेत. परंतु या तुलनेत बाजारभाव देखील मिळेनात. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
* अपेक्षा फोल ठरली
मागील वर्षी देखील सोयाबीनला म्हणावा असा बाजारभाव भेटला नाही. यावर्षी सोयाबीनला बाजारभाव जास्त भेटेल अशी अपेक्षा होती. परंतु यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत देखील कमी बाजारभाव मिळतोय असे चित्र आहे. कारण गेल्या वर्षी साडेसहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळालेला होता. परंतु यंदा साडेचार हजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची बाजारभाव वाढीची अपेक्षा फोल ठरली आहे.