कृषी

Farming Business Idea : भावा कोण म्हणतं शेतीत नाही दम! 800 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची लागवड करा, लाखोंची कमाई होणारं

Farming Business Idea : गेल्या काही वर्षांपासून भारतीय शेतीत (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे. आता देशातील तरुण वर्ग शेतीकडे (Agriculture) अधिक आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो जाणकार लोक देखील शेतीमध्ये प्रचंड क्षमता असल्याचे सांगत आहेत.

जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी (Farmer) जर बाजारपेठेतील परिस्थिती समजून घेता पिकांची शेती केल्यास शेतकऱ्यांना यातून फायदा होणार आहे. बाजारात जे विकेल तेच शेतकरी बांधवांनी पीकवायला पाहिजे असे जाणकार नमूद करत आहेत. मित्रांनो काही पिकांचा कल अचानक वाढू लागतो तर काही पिकांची मागणी कमी होऊ लागते.

खरे तर आरोग्यासाठी मौल्यवान पिके शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय होतं आहेत. काळा तांदूळ (Black Rice Crop) हे देखील असंच आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामुळे काळ्या तांदळाला बाजारात मोठी मागणी आली आहे.

काळ्या भाताला सामान्य भाताच्या बाजारभावापेक्षा (Black Rice Rate) कितीतरी अधिक बाजारभाव मिळतं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शुगर, ब्लडप्रेशर यांसारख्या जीवनशैलीतील आजारांवर ते गुणकारी आहे. काळ्या धानाची मागणी पाहता आणि त्याला सामान्य तांदळापेक्षा अधिक बाजारभाव मिळत असल्याने आता शेतकऱ्यांचा कल काळ्या तांदळाच्या शेतीकडे (Black Rice Farming) वळू लागला आहे.

काळ्या तांदळाच्या शेतीसाठी कमी खर्च येतो

मित्रांनो सामान्य तांदळाची किंमत 40 ते 200 रुपये दरम्यान असते. मात्र काळ्या तांदळाची किंमत 500 रुपये किलो पर्यंत आहे. सुरुवातीला या तांदूळांची लागवड चीनमध्ये केली जात होती. पण नंतर ईशान्येकडील आसाम, सिक्कीम, मणिपूर या राज्यांत काळ्या तांदळाची लागवड सुरू झाली.

त्यानंतर हळूहळू मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही या भाताची लागवड केली जात आहे. याच्या लागवडीमध्ये खते, कीटकनाशके वापरली जात नाहीत, त्यामुळे त्याचा लागवडीचा खर्च कमी आहे, या भातामध्ये रसायनांचा धोका नाही. त्यामुळेच काळ्या धानाचे उत्पादन सामान्य धानापेक्षा कमी असले तरी शेतकऱ्यांना त्यातून चांगला नफा मिळतो.

काळा तांदूळ वनस्पती तुटण्याची समस्या नसते 

काळा तांदूळ पीक तयार होण्यासाठी सुमारे 100 ते 110 दिवस लागतात. एक बिघा जमिनीत तीन किलो बियाणे लावता येते. कमी पाण्‍याच्‍या जागी त्‍यांची लागवड सहज होते. त्‍याची झाडे साधारण भाताच्‍या झाडापेक्षा किंचित उंच असतात. या वनस्पती खूप मजबूत असतात. त्यामुळे जोरदार वाऱ्यातही त्यांची रोपे तुटण्याची समस्या नसते.

रंग वायलेट-निळ्यामध्ये बदलतो

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या या तांदळाला परदेशातही मोठी मागणी आहे. यात ब्राऊन राइसपेक्षा जास्त गुणधर्म आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, आयर्न, कॅल्शियम, झिंक यांसारखे पोषक घटक असतात. पिकल्यानंतर त्यांचा रंग वायलेट-निळा होतो. आता अनेक राज्यांची सरकारेही याच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहेत, जेणेकरून त्यातून अधिक नफा शेतकऱ्यांना कमवता येईल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts