Farming Business Idea : भारतातील शेतकरी (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहे. चांगला नफा (Farmer Income) मिळविण्यासाठी आता आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील दुहेरी उद्देशाच्या पिकांच्या लागवडीवर भर देत आहेत.
\म्हणजेच पीक एकच असेल, परंतु त्यातून दोन प्रकारचे उत्पादन घेता येईल. अशा तत्सम पिकामध्ये ताग शेतीचा समावेश होतो, ज्याची फुले भाजी म्हणून, तागासाठी वापरली जातात आणि उर्वरित पीकाचे अवशेष हिरवळीचे खत (Green Manure) तयार करण्यासाठी वापरले जाते.
जाणकार लोकांच्या मते हे पीक दुहेरी उद्देशाने घेतले जात असल्याने तागाची लागवड (Green Manure Farming) शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. याच्या शेतीमुळे आपण जमिनीची सुपीकता वाढवून पिकांचे अधिक उत्पादन घेऊ शकतो. तर दुसरीकडे तागाच्या पिवळ्या फुलांनाही बाजारात मोठी मागणी असून, त्यांची विक्री होऊन चांगले उत्पन्न मिळू शकते. निश्चितच या पिकापासून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळणार आहे आणि हिरवळीचे खत देखील मिळणार आहे.
या राज्यांमध्ये तागाची लागवड केली जाते बर…!
नवीन पिकाची लागवड करण्यापूर्वी शेतात हिरवळीच्या खतासाठी तागाची लागवड करणे योग्य आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्ही याचे उत्पादन घेऊ शकता, परंतु उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आणि ओरिसा येथील शेतकरी हिरवळीच्या खताव्यतिरिक्त व्यावसायिक पीक म्हणून देखील या पिकाची लागवड करतात.
सनईच्या लागवडीसाठी ओलसर वालुकामय माती किंवा चिकणमाती असलेली शेतजमीन उत्तम मानली जाते.
त्याच्या लागवडीसाठी, शेतात खोल नांगरणी केल्याने माती भुसभूशीत बनते. मग पाटा टाकून शेत समतल बनवले जाते.
खरीप हंगामाच्या पिकांपूर्वी तागाची पेरणी केली जाते आणि एप्रिल ते जुलै या कालावधीत बियाणे शेतात पेरले जाते.
पावसावर अवलंबून असलेले पीक असल्याने याच्या लागवडीसाठी जास्त सिंचनाची आवश्यकता नसते. फक्त फुले तयार होण्याच्या अवस्थेत शेतात ओलावा ठेवणे आवश्यक आहे.
तागाची कापणी नेमकी केव्हा…!
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बीजोत्पादनासाठी तागाची लागवड केल्यानंतर 150 दिवसांनी म्हणजे 5 महिन्यांनी काढणी केली जाते. दुसरीकडे तागाच्या हिरवळीच्या खताच्या लागवडीसाठी 45 ते 60 दिवसांत कापणी करून संपूर्ण पीक हिरवळीचे खत तयार करण्यासाठी शेतात पसरवले जाते.
तागापासून उत्पन्न किती मिळतं बर…!
देशातील बहुतांश भागात या पिकाची लागवड फक्त हिरवळीचे खत, पिवळी फुले किंवा ताग या उद्देशाने केली जाते. मात्र असे असले तरी सेंद्रिय शेतीच्या या युगात हिरवळीचे खतांची उपयुक्तता वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी याची व्यावसायिक शेती केल्यास त्यांना हिरवळीचे खत आणि फुलांचे उत्पादन मिळणार आहे आणि निश्चितचं या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार ठरू शकतो. तागाची फुले देखील बाजारात 200 रुपये किलो दराने विकली जातात. अशाप्रकारे मातीसाठी आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वांनी युक्त तागाची लागवड करून 10 टक्के खर्चात 100% नफा मिळवता येतो.