कृषी

Farming Business Idea : बाजारात 10 हजार रुपये प्रतिक्विंटल विकले जाते हे पीक, वाचा लागवडीपासून महत्त्वाची माहिती

Farming Business Idea : शेती करत असताना वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि त्याला आधुनिकतेची जोड दिली तर शेती नक्कीच फायद्याची होते. बाजारपेठेचा अभ्यास करून म्हणजेच ज्याला मागणी आहे त्याच पिकांची लागवड योग्य कालावधीत केल्याने खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो.

आता शेतीमध्ये भाजीपाला लागवड तसेच फळबागा लागवड यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा ट्रेंड असल्याचे दिसून येत असून त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड देखील आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत.

औषधी वनस्पतींच्या दृष्टिकोनातून जर आपण काही पिकांचा विचार केला तर  ते खूपच नवीन असून त्यांची पुरेशी माहिती देखील अजून पर्यंत शेतकऱ्यांना नाही. अशीच एक औषधी वनस्पती म्हणजे गुलखैरा ही होय. एक महत्वाची औषधी वनस्पती असून औषध तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने या पिकाची जास्त प्रमाणात मागणी असते. मागणीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गुलखैरा लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरू शकते.

 गुलखैरा शेतीची साधारण माहिती

साधारणपणे तुम्ही कोणत्याही पिकाच्या मध्यभागी म्हणजेच तुम्ही आंतरपीक म्हणून देखील गुलखैरा लागवड करू शकतात. गुल खैरा ही एक औषधी वनस्पती असून औषध कंपन्यांकडून या वनस्पतीला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. महत्वाचे म्हणजे काही कंपन्या तुम्हाला गुलखैरा लागवडीकरिता पैसे देखील पुरवतात व तुमच्याकडील पिकाची एक किंमत ठरवून घेतात.

जर आपण गुलखैरा पिकाच्या लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला तर साधारणपणे एक बिघा क्षेत्रामध्ये तुम्ही पन्नास ते साठ हजार रुपये आरामात कमवू शकतात. गुलखैरा बाजारपेठेमध्ये दहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकले जाते. तसेच या पिकाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा तुम्ही याची लागवड केल्यानंतर दुसऱ्यांदा तुम्हाला लागवड करायची असेल तर बियाणे खरेदी करण्याची गरज पडत नाही. याच पिकांच्या बिया वापरून तुम्ही पुन्हा लागवड करू शकतात. साधारणपणे गुलखैराची लागवड ही नोव्हेंबर महिन्यात केली जाते व एप्रिल ते मे पर्यंत ते काढणीस तयार होते.

 गुलखैराला मागणी असण्याचे कारण काय?

ही एक औषधी वनस्पती असल्यामुळे या वनस्पतीच्या फुलांचा, देठ आणि पानांचा अनेक युनानी औषधे बनवण्याकरिता वापर करतात. गुल खैरा वनस्पती पासून बनवलेले औषधे ताप, खोकला आणि इतर आजारांमध्ये खूप महत्त्वपूर्ण सिद्ध झाले आहे. म्हणून अनेक औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून गुल खैराची मागणी मोठ्या प्रमाणावर असते.

जागतिक पातळीवर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांमध्ये गुल खैरा लागवड होते परंतु आता भारतात देखील याची लागवड उत्तर प्रदेश राज्यातील हरदोई आणि कन्नोज तसेच उनाव यासारख्या जिल्ह्यांमध्ये होऊ लागली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts