Farming Business Idea : शेतकरी (Farmer) मित्रांनो सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. सप्टेंबर महिना हा शेती व्यवसायासाठी (Farming) महत्वाचा मानला जातो. आगामी काही दिवसात मान्सून (Monsoon) देखील संपूर्ण भारतवर्षातुन अलविदा घेणार असल्याने वातावरणात देखील बदल होणार आहे.
त्यामुळे बदलत्या वातावरणात शेतकरी बांधवांनी शेतीची कामे केली पाहिजेत. तसेच सप्टेंबर महिन्यात कोणत्या पिकाची (September Crop) शेतकरी बांधवांनी शेती केली पाहिजे जेणेकरून त्यांना चांगली कमाई (Farmer Income) होईल. याविषयी आज आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सप्टेंबरमध्ये भाजीपाला लागवड करा (Farming Business Idea)
भाजीपाला आणि बागायती पिकांसाठी सप्टेंबर हा महत्त्वाचा महिना मानला जातो. भाजीपाला पिके (Vegetable Crop) आणि बागकामासाठी हा महिना योग्य आहे, त्यामुळे तुम्हालाही भाजीपाला लागवड (Vegetable Farming) करायची असेल तर हे काम या महिन्यात पूर्ण करा.
येथे आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्यांची लागवड करण्याचा सल्ला देणार आहोत, ज्याची लागवड करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. या लेखात खाली दिलेल्या भाज्या केवळ खायलाच उत्तम नसतात, तर त्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानल्या जातात, त्यामुळे त्यांची मागणी वर्षभर बाजारात राहते. अशा परिस्थितीत सप्टेंबर मध्ये या भाजीपाला पिकांची शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे.
टोमॅटो लागवडीसाठी योग्य वेळ आहे बर :- जाणकार लोकांच्या मते, टोमॅटो लागवडीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. या कालावधीत टोमॅटोची लागवड केल्यास त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी म्हणजे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत त्याचे पीक तयार होते. मित्रांनो बाजारात टोमॅटोची मागणी वर्षभर सारखीच असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर याची लागवड केल्यास त्यांना लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
फुलकोबी शेती करण्यासाठी अनुकूल वेळ :- फुलकोबी ही अशी भाजी आहे, जी सर्वांनाच आवडते. हिवाळा आला की त्याची भाजी, पकोडे, पराठे हे प्रत्येक घरात नक्कीच खाल्ले जातात. आता लोकांनी फुलकोबी सूप आणि लोणच्याच्या स्वरूपातही वापरण्यास सुरुवात केले आहे. यासोबतच याच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे बाजारात याला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या महिन्यात फुलकोबी पिकाची लागवड करावी असा सल्ला दिला जात आहे. या पिकाची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केली जाते. लागवड केल्यानंतर सुमारे 60 ते 150 दिवसांत फुलकोबीचे पीक विक्रीसाठी तयार होते.
मिरचीची शेती :- सप्टेंबर ते ऑक्टोबर हे महिने मिरची लागवडीसाठी सर्वात योग्य मानले जातात. खरे पाहता आता मिरचीची शेती बारा महिने केली जाते. मात्र सप्टेंबर तसे ऑक्टोबर महिन्यात मिरचीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या मिरचीची लागवड करून शेतकरी बांधव 140 ते 180 दिवसांत त्यातून नफा मिळवू शकतात. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने मिरचीच्या सुधारित वाणांची शेती केली पाहिजे. यामुळे शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन मिळणार आहे.
कोबी लागवड :- सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी बांधव कोबीची देखील लागवड करू शकतात. त्याची लागवड बेड तयार करून केली जाते. कोबीच्या शेतीतुन 2 ते 4 महिन्यांत उत्पन्न मिळते. शेतकरी बांधवांनी सुधारित जातीच्या कोबीची लागवड केली तर अवघ्या 60 दिवसांनंतर, त्याचे पीक बाजारात विक्रीसाठी तयार होते. त्यामुळे हिवाळ्यात शेतकऱ्यांना चांगला नफा मिळावा यासाठी सप्टेंबर महिन्यात याची लागवड करण्याचा सल्ला दिला जात आहे.
वांग्याची लागवड :- वांगी ही मूळची भारतातील असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्याची लागवड सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते आणि पेरणीनंतर सुमारे 2 ते 3 महिन्यांनी वांग्याचे पीक तयार होते. या पिकाची देखील बाजारात बारामाही मागणी असते. यामुळे शेतकरी बांधवांना या पिकाची शेती देखील मालामाल बनवणार आहे.