कृषी

Farming Tips: पिकांवरील किडिंचे नियंत्रण करा कमीत कमी खर्चात,ही उपाययोजना ठरेल फायद्याची

Farming Tips: पिकांचे व्यवस्थापन करताना पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे कीड व रोग व्यवस्थापनाला देखील आहे. जर पिकांचा उत्पादन खर्च पाहिला तर सगळ्यात जास्त खर्च हा शेतकऱ्यांचा कीड नियंत्रणासाठी होत असतो. पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचा किडींचा प्रादुर्भाव होत असतो हो प्रादुर्भाव वाढला तर पिकांच्या उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळे शेतकरी बंधू अनेक प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या करतात. परंतु फवारण्या करून देखील  अपेक्षित प्रमाणात किडींचे नियंत्रण होईल असे दिसून येत नाही. त्यामुळे खर्च तर वाढतोच परंतु फायदा खूप कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान होते. त्यामुळे बरेच शेतकरी एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणावर भर देतात. यामध्ये अनेक प्रकारचे प्रकाश सापळे

शेतात बसवले जातात व त्यांच्या साह्याने कीड नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो.

साधारणपणे भाजीपाला पिके तसेच फळपिके व इतर पिकांमध्ये जे काही किडी दिसून येतात ते निशाचर वर्गातील म्हणजेच रात्री मोठ्या प्रमाणावर फिरणारे असतात. तसेच यामध्ये महत्त्वाचे म्हणजे किडींच्या नर व मादीचे मिलन हे रात्रीच्या वेळी होत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रकाश सापळ्यांचा वापर करणे फायद्याचे ठरते. परंतु प्रकाश सापळ्यांचा खर्च देखील बऱ्याचदा जास्त असल्यामुळे साध्या पद्धतीने प्रकाश सापळा तयार करून त्याचा उपयोग किडनियंत्रणासाठी करणे खूप गरजेचे आहे. म्हणून आपण या लेखात कशा पद्धतीने हा प्रकाश सापळा तयार करावा याबद्दलची माहिती घेणार आहोत.

 प्रकाश सापळे बसवण्याची पद्धत

याकरिता तुम्ही पिकामध्ये जेव्हा कीड येते त्या कालावधीमध्ये जमिनीपासून चार ते पाच फूट उंच एक बल्ब लावा व या बल्बच्या अर्धा ते एक फुट खाली एक पाण्याने भरून भांडे ठेवावे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही कमी खर्चाचा प्रकाश सापळा तयार करू शकतात. रात्रीच्या वेळेस किडी जेव्हा बाहेर फिरतात तेव्हा पिकामध्ये लावलेल्या या बल्बच्या प्रकाशाकडे या किडींचे प्रौढ आकर्षित होतात.

यामध्ये नर आणि मादी असा दोघांचा समावेश असतो. सुरुवातीला आहे कीटक या बल्बच्या प्रकाशामुळे त्या सभोवती गोल फिरतात व फिरत असताना खाली भांड्यात ठेवलेल्या पाण्याला त्यांचा स्पर्श होतो व त्यामध्ये ते बुडतात व मरतात. अशा साध्या पद्धतीने तुम्ही किडींचे परफेक्ट नियंत्रण मिळवू शकतात.

 कमी खर्चाच्या प्रकाश सापळ्यांच्या माध्यमातून या किडीचे करता येते नियंत्रण

या प्रकाश सापळ्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व प्रकारची भाजीपाल्या पिकांमध्ये असलेली बोंड आळी तसेच लष्करी अळी, तुडतुड्यासारखा रस शोषक कीड, खोडकिडी तसेच भात पिकातील खोडकिड व पाने खाणारे अळीचा पतंग, आंबा तसेच काजू व चिकू इत्यादी फळ पिकांमधील किडी यांचा बंदोबस्त करू शकतात. तसेच फुल पिकांमधील कळी खाणाऱ्या अळीचा व लष्करी अळीचा देखील बंदोबस्त या माध्यमातून करता येतो.

 या प्रकाश सापळ्याचा वापर कसा करावा?

साधारणपणे रात्री सात ते दहा वाजेच्या दरम्यान या सापळ्यातील बल्ब चालू ठेवावा व नंतर त्याला बंद करून टाकावा. कारण रात्री खूप उशिरा मित्र कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि पाण्यात बुडून मरतात. त्यामुळे मित्र कीटकांच्या संरक्षणासाठी सात ते दहा या कालावधीतच बल्ब चालू ठेवावे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts