Fertilizer Price :- जर आपण कुठल्याही पिकांचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा रासायनिक खते व बी बियाणे, कीटकनाशक खरेदीवर होत असतो. पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता रासायनिक खतांची आवश्यकता भासत असते. रासायनिक खतांच्या बाबतीत बऱ्याचदा अनुभव येतो की जेव्हा पिकांना खतांची गरज असते तेव्हाच कृषी सेवा केंद्र चालकांकडून खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते व किमती वाढवून खत विक्री केली जाते.
त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांच्या खऱ्या किमती काय आहेत हे देखील माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे. परंतु आपल्याला खतांची अस्सल किंवा खरी किंमत काय आहे हे कुठून कळेल हे देखील माहिती असते तेवढेच गरजेचे आहे.
कारण बऱ्याचदा शेतकऱ्यांची या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. याच फसवणुकीला आळा बसावा याकरिता शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी खतांचे दर ऑनलाइन पद्धतीने तपासायची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जवळच्या खत विक्री दुकानांमध्ये किती खतांचा साठा शिल्लक आहे हे तुम्ही तुमच्या हातातील मोबाईलचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता.
या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात खतांचे दर
खत खरेदी करण्याअगोदर तुम्हाला संबंधित खताचे दर काय आहेत हे माहीत असणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून खत विक्री दुकानदाराचा जास्त किमतीला खत विक्री करत असेल तर तुम्ही त्याला असे करण्यापासून थांबवू शकतात व तुमचे आणि इतर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवू शकता.
ही एकदम साधी अशी ऑनलाइन पद्धत असून कोणताही अशिक्षित शेतकरी देखील अगदी साध्या पद्धतीने खताचे दर ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता.याकरिता शासनाने ऑनलाईन सुविधा तयार केली असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. त्याकरिता तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईल मधील गुगल या ठिकाणी जाऊन किसान सुविधा अस टाईप करून किसान सुविधा नावाच्या पोर्टल वर जाणे गरजेचे आहे व तुम्ही किसान सुविधा नावाच्या पोर्टलवर जाल तेव्हा तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड उघडतो.
या उघडलेल्या डॅशबोर्डवर असलेल्या अनेक पर्यायांपैकी खतांच्या किमती या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे असून राज्य निवडल्यानंतर तुम्हाला त्या दिवसाच्या सर्व प्रकारच्या खतांची रास्त आणि खरी किंमत पाहायला मिळते. त्यामुळे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जर खतांचे दर माहिती पडले तर तुम्ही दुकानदाराकडून ज्यादा दराने खत घेऊ शकणार नाहीत व तुमच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानी पासून तुम्ही वाचू शकता.