कृषी

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकरी शेतीमाल बांधावरून थेट सातासमुद्रापार विकता येणार; कसा घ्यावा योजनेचा लाभ जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Government scheme : भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारताची निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेती क्षेत्रातून निघणाऱ्या उत्पादनावर अवलंबून आहे.

पण शेतीमालाचे सतत कमी होत असलेले दर यामुळे शेतकरी हवालदिल होऊन शेती क्षेत्राकडे पाठ फिरवत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार वेळोवेळी योजना आखत असते.

त्यातच आता सरकारने ऑगस्ट 2020 मध्ये कृषी उडान योजना सुरू केली. त्यातच पुन्हा ऑक्टोबर 2021 मध्ये, ही योजना अपग्रेड करून त्याला कृषी उडान 2.0 असे नाव देण्यात आले.

या योजनेतून शेतकऱ्यांना असा फायदा होणार आहे की,शेतकऱ्याचा नाशवंत शेतीमाल हा हवाई मार्गे परदेशात निर्यात करून शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे शेतकरी या योजनेमुळे आपला माल थेट बांधावरून परदेशात विक्री करु शकणार आहे. त्यासाठी सरकारकडून अनुदानही देण्यात येणार आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे ही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे

1) सर्व प्रथम अर्जदार शेतकरी असावा, तरच त्याला हा फायदा घेता येणार आहे.

2) अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

3) अर्जदाराचे आधार कार्ड

4) अर्जदाराने निवास प्रमाणपत्र दाखवायलाच हवे.

5) अर्जदाराला शेतीशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील.

6) रेशन कार्ड.

7) मोबाइल क्रमांक आदी बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts