अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Grape Farming :-शेतीक्षेत्रात कष्ट कष्ट आणि कष्ट केल्यास निश्चितच यशाला गवसणी घालता येऊ शकते मात्र कष्टासमवेतच योग्य नियोजन करणे अनिवार्य झाले आहे.
कष्ट आणि नियोजन यांची योग्य सांगड घातली तर शंभर टक्के शेतीतून चांगले उत्पन्न मिळवले जाऊ शकते हे पुणे जिल्ह्यातील (Pune District) शिरूर तालुक्याच्या एका 72 वर्षीय नवयुवक शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिरूर तालुक्याच्या मौजे न्हावरे येथील दादासाहेब खंडागळे या 72 वर्षीय युवक शेतकऱ्याने यशस्वी द्राक्ष शेती (Grape Cultivation) करून दाखवली आहे विशेष म्हणजे दादासाहेबांनी उत्पादित केलेले द्राक्षे आता थेट दुबईच्या (Dubai) वारीला जाणार आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दादासाहेब यांनी आपली दोन मुले दीपक व सुनील यांच्या सहकार्यातून द्राक्षाची लागवड केली आहे. शिरूर खरे पाहता दुष्काळसदृश्य तालुक्यांच्या यादीत यायचा मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची ही मनाशी खूणगाठ बांधलेल्या दादासाहेबांनी शेततळ्यातील पाण्याचा वापर करून 4 एकर क्षेत्रात द्राक्षाची लागवड (Grape Farming) केली.
आता या चार एकर क्षेत्रातून सुमारे 70 टन द्राक्षांचे उत्पादन (Grape Production) दादासाहेबांना मिळाले आहे. उत्पादित केलेल्या उत्तम दर्जाच्या द्राक्षपासून चांगले उत्पन्न मिळावे म्हणून दादासाहेब द्राक्षाची परदेशात निर्यात (Export of grapes abroad) करणार आहेत.
यासाठी शेतात लगबग देखील सुरू झाली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शिरूर तालुका नेहमीच दुष्काळी तालुका म्हणून कुख्यात होता.
मात्र आता शिरूर तालुक्याला चासकमान डाव्या कालव्यामुळे नवीन जीवनदान मिळाले आहे. या कालव्यामुळे आता तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले आहे.
यामुळे आता तालुक्यातील बागायती क्षेत्रात देखील वाढ होऊ लागली आहे. ऊस, कांदा या पिकांबरोबर काही शेतकऱ्यांनी आता फळझांडाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे या पीकपद्धतीत केलेल्या बदलामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा होत असून आता तालुक्यातील शेतकरी सधन होऊ लागले आहेत.
दादा साहेब यांनी उत्पादित केलेले द्राक्ष आता परदेशात विक्री साठी जाणार आहेत. याकामी विशाल पठारे व द्राक्ष बागायतदार गणेश काळे यांचे दादासाहेबांना मार्गदर्शन लाभत आहे.
परदेशात सध्या द्राक्ष उत्पादनाला मोठी मागणी असल्याने दादासाहेबांनी परदेशात द्राक्ष विक्रीचा निर्णय घेतला आहे. परदेशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी सध्या दादासाहेबांच्या वावरात द्राक्ष काढणी ची कामे प्रगतिपथावर आहेत.
दादासाहेबांनी उत्पादित केलेली द्राक्ष एका कंपनीच्या माध्यमातून आता दुबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होणार आहेत निश्चितच वयाच्या 72व्या वर्षी दादासाहेबांनी मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांना मोठे प्रेरणादायी सिद्ध होऊ शकते आणि भविष्यात शेतकरी बांधव दादासाहेबांप्रमाणेच शेतीमध्ये चांगले यश संपादन करतील.