Harbhra Lagwad : हरभरा हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळतं. यामुळे अलीकडे या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते.
मात्र असे असले तरी अनेकदा हवामानातील बदलामुळे हरभरा पिकावर विल्ट डिसीज अर्थातच मर रोग मोठ्या प्रमाणात आढळतो. या मर रोगामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात मोठी घट होत असते. यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसतो. विशेष म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर याच्यावर नियंत्रण मिळवणे जवळपास अशक्यच बनून बसते.
मात्र, नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. तसेच काही प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच पीक व्यवस्थापनामधील काही मूलभूत बाबी अंगीकारून शेतकरी बांधव रोगावर निश्चितच कुठे ना कुठे नियंत्रण मिळवू शकतो तसेच रोग न येण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
मर रोगाची लक्षणे :- कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा व्यवस्थापन करण्यासाठी त्या आजाराची लक्षणे माहीत असणे आवश्यक असते. या मर रोगाचा हरभरा पिकावर प्रादुर्भाव हा सुरुवातीला शेताच्या एका लहान कोपऱ्यात दिसतो आणि मग हळूहळू संपूर्ण शेतात पसरतात. या रोगाचा हरभरा पिकावर प्रादुर्भाव झाला की रोपाची पाने सुकतात, त्यानंतर संपूर्ण झाड सुकते. प्रादुर्भावग्रस्त रोपाच्या मुळाजवळ चीरा केल्यावर त्यात काळी रचना दिसते जी की बुरशी असते. रोगग्रस्त झाडांच्या शेंगा आणि बिया सामान्यत: सामान्य झाडांच्या तुलनेत लहान, सुकलेल्या आणि रंगलेल्या असतात.
प्रतिबंधात्मक उपाययोजना :- या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना सर्वात असल्याचे आढळून आले आहे. यामुळे हा रोग येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी हरभऱ्याची योग्य वेळी पेरणी करावी. मे ते जून या कालावधीत उन्हाळ्यात खोल नांगरणी केल्यास फ्युसेरियम बुरशीची वाढ कमी होते. तसेच नांगरणी झाल्यानंतर जमीन काही काळ तसेच मोकळी राहू द्यावी जेणेकरून त्यामध्ये असलेले हानिकारक बॅक्टेरिया किंवा इतर कीटक मरण पावतील. तसेच हेक्टरी पाच टन कंपोस्ट खताचा वापर करावा. बियाणे जमिनीत 8 सेमी खोलीवर पेरले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरभऱ्याच्या रोग प्रतिरोधक जातीची लागवड करावी, जाणकार लोक देखील या गोष्टीला अधिक प्राधान्य देतात. मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तीन वर्षांच्या पीक आवर्तनाचा अवलंब करावा. मोहरी किंवा जवस हे पीक हरभऱ्यासह आंतरपीक म्हणून घेतले पाहिजे. या प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठे ना कुठे या रोगावर प्रतिबंध करण्यास मदत होईल.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
रासायनिक नियंत्रण :- हरभरा पिकासाठी घातक ठरणाऱ्या या रोगाच्या नियंत्रणासाठी, टेब्युकोनाझोल 54% W, W FS/4.0 ml प्रति 10 किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. खरं पाहता हा देखील एक प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग आहे. दरम्यान जर हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर म्हणजे उभ्या पिकावर लक्षणे दिसू लागल्यावर क्लोरोथॅलोनिल 70% डब्ल्यूपी/300 ग्रॅम एकर किंवा कार्बेन्डाझिम, 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी @ 500 ग्रॅम एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. निश्चितच याचा किती फायदा मिळतो ही तर एक विश्लेषणात्मक बाब राहणार आहे. मात्र नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करून बघायला काय हरकत नाही. दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, कोणत्याही औषधाची अन कोणत्याही पिकावर फवारणी करणे अगोदर तज्ञ लोकांचा सल्ला घेणे त्यांच्यासाठी अपरिहार्य राहणार आहे.