कृषी

Harbhra Lagwad Mahiti : हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव ; असे करा नियंत्रण, नाहीतर….

Harbhra Lagwad Mahiti : सध्या रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी शेतकरी राजा लगबग करत आहे. रब्बी हंगामात शेतकरी गहू हरभरा जवस यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.

मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र समवेतच संपूर्ण भारतात हवामानात होत असलेल्या बदलामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आले आहेत. पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट पाहायला मिळत आहे. तापमानात होत असलेल्या चढउतारामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे हरभरा या रब्बी हंगामातील मुख्य पिकावर देखील मररोग वाढण्याची शक्यता आहे.

या रोगामुळे हरभरा पिकाची मोठी हानी होते आणि उत्पादनात मोठी घट होऊ शकते. यामुळे तज्ञ लोक या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत आज आपण हरभरा पिकावर जर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी जाणून घेणार आहोत.

मर रोगामुळे हरभरा पिक सुकून जाते. या रोगाच्या प्रादुर्भाव एवढा वेगाने होतो की शेतकऱ्यांनी काही उपाययोजना करण्याअगोदरच पीक वाया जाते. तुमच्या हरभर्‍याच्या झाडांना मर रोग झाला आहे की नाही हे ओळखायचे असेल, तर काही झाडांच्या मुळांजवळ खोदावे त्यात काळी रचना दिसली तर समजा तुमच्या झाडांना हा रोग झाला आहे. मरारोग झाल्याचे समजल्यानंतर शेतकऱ्यांनी ताबडतोब या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.

मररोगापासून पिकांचे संरक्षण कसे करणार बरं….!

हरभरा पिकासाठी घातक ठरत असलेल्या या मर रोगापासून संरक्षण करायचे असल्यास प्रतिबंधात्मक उपायोजना कराव्या लागतात. यामध्ये पेरणीपूर्वी 1.25 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि थायरम 2-2.5 किलो बियाण्यांमध्ये मिसळून बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून दिला जातो.

एकाच जमिनीत वारंवार हरभरा पिकाची पेरणी करू नये. म्हणजे पिकाची फेरपालट करावी आणि दर तीन वर्षांनी हरभरा ऐवजी दुसरे पीक घ्यावे.

हरभरा पेरणी करण्यापूर्वी पूर्वमशागतीच्या वेळी शेणखताचा वापर करावा.

पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक टाकावे.

तसेच हरभरा पिकाची नव्याने विकसित आणि मर रोगास प्रतिकारक असलेल्या जातीची पेरणी करा. 

परंतु जर तुम्ही बीजप्रक्रिया केलेली नसेल आणि मररोग लागला असेल तर अशावेळी शेतकरी बांधवांनी कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. यासाठी कृषी सेवा केंद्र चालकाचा देखील सल्ला घेतला जाऊ शकतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts