अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Krushi News :- आजच्या शेतकऱ्यांने शेतीत नवनवीन प्रयोग करून पीक पद्धती मध्ये बदल घडवून आणले आहे. पिकांमधून आधीचा नफा कसा मिळवता येईल याचा प्रयत्न शेतकरी करत असतो.
अशाच एका शेतकऱ्यांनी शेतीत पीक पद्धतीत बदल करून निळ्या कलर च्या बटाट्याची यशस्वी शेती करून दाखवली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाल पासून जवळ असणाऱ्या खजुरी कला या गावातील रहिवासी शेतकरी मिश्रीलाल राजपूत यांनी ही किमया करून दाखवली आहे.
या निळ्या बटाट्याचे दुसरे नाव नीलकंठ असे ही आहे.हे बटाटे चवीला उत्कृष्ट आहे. शिवाय यामध्ये असणारे आयुर्वेदिक गुणधर्म मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
नीलकंठ बटाट्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आढळतात.हे एंटीऑक्सीडेंट मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
हे सामान्य बटाट्यापेक्षा लवकर शिजवलेले जाऊ शकते. या जातीच्या 100 ग्रॅम बटाट्यामध्ये अँथासायनिन मूलद्रव्याचे प्रमाण 100 मायक्रोग्रॅम आणि कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण 300 मायक्रोग्रॅमपर्यंत असते.
सामान्य बटाट्यामध्ये 15 मायक्रोग्रॅम अँथासायनिन्स आणि 70 मायक्रोग्रॅम कॅरोटीनोइड्स असतात. या घटकांना सामान्यतः अँटी-ऑक्सिडंट म्हणतात.
अँटिऑक्सिडंट्स शरीरातील अपचनीय घटक अर्थात हानिकारक घटकांचा नाश करतात आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात.
असा दावा करण्यात आला आहे. तर मिश्रीलाल यांनी बटाट्याची ही जात केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमला येथून आणली आसून बटाटा बाजारात विक्रीसाठी नेणार नसल्याचे सांगितले आहे.
सर्व्यात आधी मिश्रीलाल या जातीच्या बटाट्याचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून घेणार आहेत. आणि मग मिश्रीलाल या बटाट्याची व्यापारासाठी लागवड करणार असल्याचे सांगितले गेले आहे.