कृषी

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचीं कमाल !; सोयाबीनपासून बनवलेत गुलाबजामून

Hingoli News : शेतकरी बांधव नेहमीच आपल्या प्रयोगातून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव गाजवलं आहे. त्यातच आता हिंगोली जिल्ह्यातून एक शेतकरी गट चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

चर्चेला येण्याचे कारणही तसं खास आहे. या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गटाने सोयाबीन पासून गुलाब जामुन बनवण्याची किमया साधली आहे. या गटाने केलेली ही कामगिरी निश्चितच इतरांसाठी प्रेरक असून यासंदर्भात पाणी फाउंडेशनने स्वतः माहिती दिली आहे.

पाणी फाउंडेशन ने आपल्या फेसबुक हँडल वरून यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. पाणी फाउंडेशन कडून फार्मर्स कप नावाची स्पर्धा चालवली जाते. याच स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकरी गटाने सहभाग नोंदवला आहे.

कळमनुरी तालुक्यातील कवडा, वारंगा मसाई, बेलमंडळ आणि सिंदगी या गावातल्या शेतकऱ्यांनी मिळवून बनवलेल्या शेतकरी गटाने सोयाबीन पासून गुलाब जामून बनवलेत. तेही अस्सल तुपातले. इतकचं नाही तर त्यांनी सोयाबीनपासून दूध, पनीर, खवा असे पदार्थ देखील तयार केले आहेत.

निश्चितच या सोयाबीन उत्पादकांचा हा प्रयोग महाराष्ट्रातील इतर सोयाबीन उत्पादकांना एक दिशादर्शक ठरणार असून शेतमाल थेट बाजारात विक्री करणे ऐवजी मूल्यवर्धन करून त्याची विक्री केली तर शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकते. आशा परिस्थितीत शेतकरी बांधव प्रक्रिया उद्योगाचा सहारा घेऊ शकतात.

हिंगोली जिल्ह्यातील या शेतकरी गटाने ज्या पद्धतीने सोयाबीनपासून गुलाब जामुन, खवा, पनीर यांसारख्या बायप्रॉडक्ट्सची निर्मिती केली आहे, असे बायप्रोडक्स तयार करून सोयाबीन उत्पादक लाखो रुपयांची सहजरीत्या कमाई करू शकतात. निश्चितच शेतमालाचीं बाजारात थेट विक्री केली तर शेतकऱ्यांना अतिशय कमी उत्पन्न मिळतं.

परंतु जर शेतमालावर प्रक्रिया करून, मूल्यवर्धन करून त्यापासून वेगवेगळे बायप्रॉडक्ट तयार केले तर निश्चितच शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नात भर पाडता येणं शक्य होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts