Ahmednagarlive24.com Successful Farmer: कधी-कधी एखादी घटना एका क्षणात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करण्यास सक्षम असते. केवळ एक महत्वाची चांगली किंवा वाईट घटना व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील बरेली येथील रहिवासी असलेल्या रामवीर सिंगचीही काहीशी अशीच कहाणी आहे.
रामवीर यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्यांनी नोकरीला राम राम ठोकला अन चांगल्या प्रतीच्या भाजीपाला उत्पादीत (Vegetable Production) करण्यास सुरवात केली. आज रामवीर यांनी भाजीपाला लागवडीतून (Vegetable Farming) लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया रामवीर यांच्या आयुष्यात असं काय घडलं होतं ज्यामुळे रामवीर यांनी नोकरीं सोडून शेती (Farming) करण्याचा निर्णय घेतला.
मित्रांनो खरं पाहता 2009 मध्ये रामवीर सिंगच्या मित्राच्या काकांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. कीटकनाशकामुळे त्यांना कर्करोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून रामवीरला मोठा धक्काच बसला. तेव्हाच त्याने आपल्या कुटुंबाला रसायनयुक्त भाज्या खाण्यापासून वाचवण्यासाठी भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला. रामवीर सिंगसाठी शेती करणे हे सोपे नव्हते. रामवीर खरं पाहता पत्रकार होते आणि चांगल्या पगारावर नोकरीं करत होते.
रामवीर यांनी पूर्णवेळ पत्रकारितेची नोकरी सोडली. यानंतर ते सेंद्रिय भाजीपाला (Organic Vegetable) पिकवण्यासाठी आपल्या जन्मगावी बरेली येथे परतले. तिथे त्यांनी फ्रीलान्स पद्धतीने पत्रकार म्हणुन एका खोलीत काम करायला सुरुवात केली. जेणेकरून ते भाजीपाला लागवडीसाठी अधिक वेळ देऊ शकतील.
आज रामवीर सिंग यांच्या तीन मजली घरात भाजीपाला पिकवला जातं आहे. बाल्कनीत लुफा आणि टेरेसवर टोमॅटोचे (Tomato Farming) ते पीक घेत आहेत. त्यांनी एका अगदी छोट्याशा गावात आधुनिक पद्धतीने हायड्रोपोनिक शेती (Hydroponic farming) करण्यास सुरुवात केली आहे. सध्या भाजीपाला विकून रामवीर वर्षाला लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
दुबईची कल्पना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो 2017-18 मध्ये दुबईला गेला होता. तेथे त्यांनी हायड्रोपोनिक शेती पाहिली. ते त्याच्यावर खूप प्रभावित झाले. या आधुनिक शेतीमध्ये मातीशिवाय पाण्याने शेती करता येते. तसेच कीटकनाशकांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
याशिवाय 80 टक्के पाण्याची बचतही होते. दुबईहुन परतल्यावर कोलकाता आणि मुंबईतील काही ओळखीच्या व्यक्तीकडूनही त्यांनी याबाबत माहिती घेतली. इंटरनेटवरही शोधाशोध केली माहिती जमवली. मग काय पत्रकार बाबूने बरेलीतील पिलीभीत रोडवर असलेल्या घरात आधुनिक पद्धतीने हायड्रोपोनिक टेक्निकने शेती करण्यास सुरुवात केली.
हायड्रोपोनिक्स प्रणाली कशी विकसित केली
रामवीरने आपली बाल्कनी आणि मोकळी जागा हायड्रोपोनिक्स शेतीसाठी निवडली. हायड्रोपोनिक्स प्रणाली पद्धतशीरपणे आयोजित करण्यासाठी पीव्हीसी पाईपचा वापर केला जातो. ज्यामध्ये थोड्या अंतरावर छिद्र करून जाळीचे भांडे ठेवण्यासाठी जागा बनवली जाते. हे सर्व पाईप उताराने एकमेकांना जोडलेले आहेत. त्यात शेकडो झाडे लावण्यात येतात. त्या झाडांना पाणी देण्यासाठी पाईपच्या एका टोकापासून मोटारपंपाद्वारे पाणी दिले जाते. जे सर्व पाईप्समधून जाते आणि टाकीमध्ये परत येते.
अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्या
रामवीरने आपल्या शेतात 10,000 हून अधिक रोपे लावली आहेत. त्यांचे शेत 750 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले आहे. तो सिमला मिरची, भिंडी, मिरची, बाटली, टोमॅटो, फ्लॉवर, पालक, कोबी, मेथी, स्ट्रॉबेरी आणि हिरवे वाटाणे पिकवतो. रामवीर म्हणतात की, ते सर्व हंगामी भाज्या हेपोड्रोपोनिक्स पद्धतीने पिकवतात. ते स्वतःच्या जेवणात देखील याचं भाज्यांचा वापर करतात. याशिवाय ते भाजीपाला विकून लाखो कमावतात.
रामवीर सिंग यांचा असा विश्वास आहे की, हॅपोड्रोपोनिक शेती ही इतर सेंद्रिय शेतीपेक्षा आरोग्यदायी आणि चांगली आहे. यामध्ये पिकवलेल्या भाज्यांमध्ये पोषकद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषली जातात. याशिवाय या पद्धतीमुळे माती प्रदूषणाचा धोका नाही. हे हानिकारक कीटकनाशकांपासून देखील मुक्त आहे.
70 लाखांची वार्षिक उलाढाल
त्याच्या तीन मजली घराचे अनोखे शेत रस्त्याने जाणाऱ्यांचेही लक्ष वेधून घेते. काँक्रीटच्या इमारतीच्या कडेला लटकलेल्या भाज्या कुठे बघायला मिळतात? यासोबतच रामवीर ‘विम्पा ऑरगॅनिक अँड हायड्रोपोनिक्स कंपनी’ देखील चालवतात. जिथे तो इतरांना ही आधुनिक शेती करायला मदत करतो. रामवीर यांच्या कंपनीचा वार्षिक महसूल आता 70 लाख रुपये असल्याचा दावा केला जातं आहे.
निश्चितच रामवीर यांनी मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणार आहे आणि भविष्यात रामवीर यांच्या प्रमाणे अनेक शेतकरी बांधव आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात चांगले नेत्रदीपक यश संपादन करतील.