Kapus Bajar Bhav : कापसाची शेती (Cotton Farming) संपूर्ण भारत वर्षात केली जाते. महाराष्ट्रात देखील कापूस लागवडीखालील (Cotton Cultivation) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील खानदेश प्रांत कापसाच्या उत्पादनासाठी (Cotton Production) संपूर्ण भारतात ओळखला जातो.
खांदेशातील सर्वच जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान खानदेशमध्ये कापसाचे हार्वेस्टिंग (Cotton Harvesting) सुरु असून शेतकरी बांधव (Farmer) आता काढणी केलेला कापूस साठवणूक करण्यावर भर देत आहे. बाजारात कापसाला नगण्य बाजारभाव (Cotton Rate) मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आता कापसाची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
मात्र कापसाची साठवणूक करताना देखील शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकरी बांधवांकडे साठवणुकीसाठी घरात पुरेशी जागा नसल्यामुळे परतीच्या पावसामुळे काढणी केलेला कापूस देखील भिजला आहे.
शिवाय ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी उसनवारीने पैसे घेऊन किंवा व्याजाने पैसे काढून कापसाची लागवड केली आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या सणाला शेतकरी बांधवांना पैशांची परतफेड करण्यासाठी मिळेल त्या दरात कापसाची विक्री करावी लागत आहे. मित्रांनो सध्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव खानदेशात मिळत आहे.
मात्र सध्या मिळत असलेल्या बाजार भावात कापूस पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्किल असल्याचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. खरं पाहता हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच मुहूर्ताच्या कापूस विक्रीला कापसाला उच्चांकी बाजार भाव मिळाला होता. खानदेशात जळगाव जिल्ह्यात कापसाला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव नमूद करण्यात आला होता.
तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातही कापसाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला होता. मात्र मुहूर्ताचा तेवढा कालावधी सोडता कापसाच्या बाजार भावात घसरण पाहायला मिळाली आहे. शेतकरी बांधवांच्या मते, सध्या बाजारात येत असलेला कापूस ओला असल्याचे कारण पुढे करत व्यापारीवर्ग कापसाचे बाजार भाव हाणून पाडत आहेत.
अशा परिस्थितीत ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कापसाचे बाजार भाव डगमगले असल्याने शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला आहे. येत्या काही दिवसात कापसाच्या बाजार भावात वाढ झाली तरच शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे कापसाला दिवाळीच्या दिवसात का होईना उच्चांकी बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान अजूनही काही शेतकरी बांधवांची कापसाची हार्वेस्टिंग सुरू आहे. मात्र खानदेशात मजूर टंचाई प्रकर्षाने जाणवत असल्याने कापूस वेचणीला विलंब होत आहे.
यामुळे कापसाचा दर्जा खालावल्याचे शक्यता असून मध्येच पाऊस कोसळला तर हातातोंडाशी आलेला घास देखील शेतकरी बांधवांचा हिरावून घेतला जाऊ शकतो. यामुळे खान्देशात शेतकरी बांधव आपल्या परिवारासोबतच कापसाची वेचणी करण्यासाठी गुंतलेला दिसत आहे. एकंदरीत या वर्षी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची दिवाळी कापूस वेचणी मध्ये जाणार असल्याचे चित्र आहे. शिवाय येत्या काही दिवसात कापसाला बाजार भाव वाढला तर कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या पदरी चार पैसे शिल्लक राहतील नाही तर उत्पादन खर्च काढणे देखील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मुश्किल होणार आहे.
काही जाणकार लोकांनी कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र सध्यातरी कापसाला तेवढा बाजार भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला तरी देखील कापसासाठी झालेला खर्च निघणार नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
शेतकरी बांधवांच्या मते या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात आणि उत्पादकतेमध्ये घट होणार आहे, अशा परिस्थितीत कापसाला किमान बारा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळणे अपेक्षित आहे. निश्चितच येत्या काही दिवसात कापसाला काय बाजार भाव मिळतो यावर कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.