कृषी

ब्रेकिंग! शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय, लंपी आजाराने जनावरे दगावल्यास प्रति जनावर 30 हजाराची मदत, शासन निर्णय जारी

Lumpy Skin Disease : मित्रांनो लंपी या चर्म रोगामुळे (Lumpy Virus) भारतात पशुधनाची (Animal) मोठी हानी होत आहे. या रोगाचा आपल्या महाराष्ट्रात देखील शिरकाव झाला आहे. मित्रांनो राज्य शासनाने (State Government) दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्रात लंपी आजार हा सर्वप्रथम खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातीलं एका गोवंशीय पशुधनात आढळला.

4 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या महाराष्ट्रात लंपी आजाराचा शिरकाव झाल्याचे महाराष्ट्र शासनाने म्हटले आहे. 4 ऑगस्टला जळगाव मध्ये एका गाईला या आजाराची लागण झाली होती. त्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्रात जलद गतीने झाला असून आजच्या घडीला महाराष्ट्रातील (Maharashtra) तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये लंपी आजाराने गोवंश तसेच इतर पशुधन (Animal Care) बाधीत होत आहे.

पशुधनासाठी घातक ठरत असलेल्या या चर्मरोगावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मायबाप शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 12 सप्टेंबर 2022 रोजी शासनाने (Maharashtra) एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक या चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर बोलावली होती. या बैठकीत या चर्मरोगावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना सूचना देखील जारी करण्यात आल्या होत्या.

या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळास वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली होती. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी / पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकरी / पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे 100 टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याची बाब शासनाकडे विचाराधीन होती.

आता मायबाप शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करून ज्या पशुपालकांचे पशुधन दगावले आहे अशा पशुपालकांना मदत शासनाकडून दिली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण शासनाने नेमका कोणता शासन निर्णय जारी केला आहे आणि किती मदत शासनाकडून दिली जाणार आहे याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो शासनाकडून मृत झालेल्या पशुधनासाठी पशुपालकांना अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

  • दुधाळ जनावरे गाय व म्हैस लंपी या चर्म रोगामुळे दगावले तर तीस हजार रुपये प्रति जनावर एवढी मदत दिली जाणार आहे, ही मदत तीन दुधाळ जनावरांना पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. म्हणजे एका पशुपालकाचे तीन दुधाळ जनावरे दगावली तर त्या पशुपालकाला तीन मृत जनावरांसाठी 90 हजारांची मदत मिळणार आहे.
  • ओढकाम करणारी जनावरे (बैल) मृत झाल्यास पशुपालकाला 25 हजार रुपये प्रति जनावर एवढी मदत दिली जाणार आहे. यामध्ये देखील तीन जनावरे पर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • वासरे या आजारामुळे दगावल्यास प्रति वासरू 16 हजार रुपयाची मदत मायबाप शासनाकडून केले जाणार आहे. यामध्ये सहा वासरापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे. म्हणजेच एका पशुपालकाचे 6 लहान जनावर किंवा वासरू दगावल्यास त्यांना 96 हजाराची मदत मिळू शकणार आहे.

ज्या पशुपालक शेतकऱ्यांचे पशुधन लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडले आहे, अशा शेतकऱ्यांनी याबाबतची सूचना तात्काळ किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात / संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक तसेच ग्रामपंचायतीस द्यावयाची आहे. संबंधित शेतकरी यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक / तलाठी, पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरीक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडल्याबाबतचा पंचनामा करून घ्यावयाचा आहे.

सदर पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लम्पी चर्मरोगामुळे झाला असल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. यानंतर तो पंचनामा संबंधित अधिकारी पुढे पाठवतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणार म्हणजे थेट खात्यात जमा होणार आहे. निश्चितच शासनाचा हा निर्णय पशुपालक शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts