अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Maharashtra Weather News :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रमीण कृषी हवामान केंद्राने या आठवड्यात शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
जिल्ह्याच्या काही तालुक्यात दोन दिवस ढगाळ हवामान राहून २९ एप्रिल ते १ मे या काळात उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा अंदाज आहे. हवामानावर अधारित कृषी सेवा सल्ला समितीची आज बैठक झाली.
त्यानंतर शेतकऱ्यांसाठी अंदाज आणि सल्ला जारी करण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात पारनेर, कर्जत, श्रीगोंदा या तालुक्यांच्या काही भागात ढगांच्या गडगडाटाची शक्यता आहे.
त्यानंतर २९ एप्रिल ते १ मे रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. या अनुषंगाने शेतकर्यांनी स्वत:ची व जनावराची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील सल्ला देण्यात आला आहे.
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उस आणि भुईमुगाच्या उभ्या पिकांना पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी पिकांना आवश्यकतेनुसार हलके सिंचन द्यावे.
गंभीर वाढीच्या टप्प्यावर सिंचनाची वारंवारता वाढवावी. नुकत्याच लागवड झालेल्या रोपांना सावली करण्याची व्यवस्था करावी. गरम वार्याला अडथळा निर्माण होण्यासाठी शेताच्या कडेला, बांधावर व्यवस्था करावी.
जनावरांना सावलीत ठेवावे आणि पिण्यास भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्यावे. जनावरांकडून सकाळी १२ ते दुपारी ३ या काळात काम करू घेऊ नये. त्यांना हिरवे गवत, प्रथिनेयुक्त, खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावे.
जनावरांना सकाळी किवा सायंकाळी चरावयास न्यावे. जनावरांच्या गोठ्याचे तापमान कमी करण्यासाठी शेडचे छत पेंढ्याने झाकावे तसेच भिंतींना पांढरा रंग द्यावा किंवा भिंतींना शेण-मातीचा लेप लावावा.
पोल्ट्री हाऊसमध्ये पडदे लावावेत आणि हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. भिंतींना पांढरा रंग द्यावा किंवा भिंतींना शेण-मातीचा लेप लावावा.