कृषी

Maize Farming: राजांनो मका पेरणीला लागा….! या जातीचं बियाणं पेरा अन लाखों कमवा, कसं ते जाणून घ्या

Maize Farming : राज्यात गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एकदा मान्सूनचा (Monsoon) पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या मते, मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. दरम्यान या दोन दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची (Rain) हजेरी बघायला मिळाली. यामुळे राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील (Kharif Season) पीक पेरणीसाठी लगबग वाढली आहे.

राज्यात सर्वत्र शेतकरी बांधव (Farmer) पेरणीच्या कामासाठी आता पुन्हा एकदा नवीन जोमाने पुढे सरसावला आहे. मित्रांनो सर्वत्र खरीप हंगामात मक्याची (Maize Cultivation) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात मक्याची लागवड करत असतात.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात, खानदेश मध्ये तसेच मराठवाड्यात अन विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात मक्‍याची पेरणी केली जाते. अशा परिस्थितीत आज आपण शेतकरी बांधवांसाठी मक्याच्या एका विशेष जातीविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया मक्याच्या या जाती (Maize Variety) विषयी.

मक्याची पायोनीर कंपनीची P3302 ही जात सर्वाधिक उत्पन्न देणारी एक प्रगत जात आहे. या जातीचा मका पेरणी केल्याने अकल्पनीय परिणाम मिळत असल्याचा दावा शेतकरी बांधव करीत असतात. या मक्काचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे या जातींचे उत्पादन जे कि तुम्हाला इतर कोणत्याही मक्केत दिसणार नाहीत.

प्रतिकूल परिस्थिती सहन करण्याची क्षमता :- या मक्याची रोग प्रतिकारशक्ती खूप जास्त असते, त्यामुळे हंगामानुसार येणारे अनेक रोग या जातीच्या मक्याच्या उत्पादनावर परिणाम करत नाहीत. इतर मक्याच्या तुलनेत, या मक्याच्या कणसात 60% पेक्षा जास्त दाणे असतात. म्हणजेच या जातीची पेरणी केल्यास शेतकरी बांधवांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळणार आहे शिवाय उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.

कमी वेळेत काढणीसाठी तयार होते:- इतर मक्याच्या जातीपेक्षा ही जात कमी वेळेत काढणीसाठी तयार होत असते. म्हणजेच कमी पाण्यातही केवळ 90 ते 100 दिवसांत बंपर उत्पादन मिळते.

मजबूत रूट सिस्टम:- इतर मक्याच्या तुलनेत या मक्याची मुळे खूप मजबूत असतात, जी अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे सहजपणे पडत नाहीत आणि तुमचे पीक खराब होते.

हा मका हलक्या जमिनीसाठी खूप चांगला आहे आणि पाऊस कमी पडला तरी खूप चांगले उत्पादन देतो मित्रांनो, 90 ते 100 दिवसात काढणीसाठी तयार होतो. या मक्याच्या जातीपासून 25 ते 30 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळत असल्याचा दावा शेतकरी बांधव करत असतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts