Maize Rate : राज्यात सोयाबीन आणि मका या दोन पिकांची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीन हे खरं पाहता एक नगदी पीक. सोयाबीन शाश्वत उत्पन्न देते म्हणून याची शेती अलीकडे वाढले आहे. मात्र यावर्षी सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळत नाहीये आणि उत्पादनात घट झाली आहे यामुळे यंदा सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
दुसरीकडे मका मात्र शेतकऱ्यांना मालामाल करत आहे. यंदा मक्याच्या उत्पादनात समाधानकारक वाढ झाली आहे तसेच त्याला चांगला दरही मिळत असल्याने मका लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. यंदा विदेशात मक्याची मागणी वाढली असल्याने आणि मक्याची आवक थोड्या प्रमाणात कमी झाली असल्याने त्याला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे.
विशेष म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान दरात अजून 50 ते 100 रुपयांची वाढ होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. सध्या स्थितीला मका 2100 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल दरात आणि 2010 प्रतिक्विंटल एवढ्या सरासरी दरात विकला जात आहे. म्हणजे 1962 या हमीभावापेक्षा मक्याला अधिक दर मिळत आहे. शिवाय दरात अजून वाढ होणार असल्याने यंदा मका उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत.
15 फेब्रुवारी नंतर मात्र उन्हाळी मक्याची आवक वाढेल आणि दरात घट होईल असे देखील सांगितले जात आहे. परंतु तूर्तास मका निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला म्हणून सोयाबीनची पेरणी थोडीशी वाढली मात्र यंदा सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळत नसून सोयाबीन उत्पादकांचा भ्रमनिरास झाला आहे.
दुसरीकडे मक्याला चांगला दर मिळत असल्याने मका उत्पादकांची चांदी होत आहे. निश्चितचं मक्याची शेती यंदा फायदेशीर ठरत आहे. मात्र यावर्षी उन्हाळी मका मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे. सध्या खरीप हंगामातील मक्याची आवक होत असून 15 फेब्रुवारी नंतर उन्हाळी मका बाजारात दाखल होणार आहे.
उन्हाळी मका ज्यावेळी बाजारात येईल त्यावेळी खरीप हंगामातील मक्याला मात्र स्पर्धा करावी लागणार आहे. यामुळे मका विक्री करताना शेतकरी बांधवांनी या गोष्टींची काळजी घेऊन आपल्या विक्रीचे नियोजन आखणे आता आवश्यक बनल आहे.
एकंदरीत सोयाबीनसाठी वाढलेला उत्पादन खर्च आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात आलेले उत्पादन आणि बाजारात मिळत असलेला दर या गोष्टींचा विचार केला असता कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन मिळणारे मक्याचे पीक शेतकऱ्यांसाठी लाभप्रद सिद्ध झाले आहे.