कृषी

Mansoon Rain: मान्सूनचा लंपडाव सुरूच, आता ‘या’ तारखेला कोकणात येणार

Maharashtra Mansoon Update: राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) तसेच राज्यातील जनता गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात या वर्षी मान्सून (Mansoon Rain) हा लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

मात्र आता हवामान विभागाचा (IMD) हा अंदाज खोटा ठरला आहे. खरं पाहता दरवर्षी मान्सून हा सात जूनच्या आसपास तळ कोकणात दाखल होत असतो. मात्र यावर्षी 7 तारीख उलटली तरी देखील मान्सून हा महाराष्ट्रात आगमन करायला तयार नसल्याचे बघायला मिळतं आहे.

दरम्यान मंगळवारी मान्सूनच्या प्रवासात थोडी गती बघायला मिळाली मात्र असे असले तरी मान्सूनच्या प्रवासासाठी अजूनही पोषक वातावरण नसल्याने अजूनही मान्सून कर्नाटकाच्या सीमाभागेतचं रेंगाळताना दिसत आहे.

हवामान विभागाच्या मते (Indian Meteorological Department) कर्नाटक मधून मान्सून (Mansoon 2022) हा संथ गतीने महाराष्ट्राकडे आगेकूच करत आहे. हवामान तज्ञांच्या मते, हवेचा दाब अनुकूल नसल्याने आता मान्सून शनिवारी दक्षिण कोकणात दाखल होणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या या नवीन अंदाजामुळे सर्वत्र मान्सूनच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.खरं पाहता, या वर्षी मान्सून हा वेळेआधीच म्हणजे 29 मे ला केरळमध्ये दाखल झाला.

नेहमी पेक्षा मान्सून केरळमध्ये तीन दिवस लवकर आला खरा मात्र त्यानंतर मान्सूनसाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सूनचा प्रवास अतिशय कासवगतीने सुरू आहे. अरबी समुद्रात हवेचा दाब जास्त असल्याने तो कर्नाटकच्या सीमाभागात जवळपास गेल्या 12 दिवसांपासून विश्रांती घेत होता.

मंगळवारी अखेर मान्सूनने किंचित प्रगती केली आणि आता मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. मात्र, त्याची गती अतिशय कमी असल्याने तळकोकणात त्याला दाखल होण्यास शनिवार पर्यंतचा काळ लागणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार, मान्सून हा 11 जून रोजी आता दक्षिण कोकण किंवा तळकोकण गाठणार असून त्यांनतर मान्सून हा अवघ्या चार दिवसात राज्यातील इतर भागात मान्सून दाखल होणार आहे.

याशिवाय राज्यातील विदर्भात अजून आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागात जास्त तापमान राहणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts