कृषी

Mansoon Update: अरे बाबा मान्सून कुठं लपलास! राज्यातील मान्सून गायब, मान्सूनच्या पावसाऐवजी राज्यात उष्णतेची लाट

Mansoon Update: या वर्षी मान्सून (Mansoon) केरळमध्ये तीन दिवस लवकर दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितले आहे.

यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सूनचे (Mansoon In Maharashtra) लवकरच आगमन होणार असल्याची आशा अनेक तज्ञांनी व्यक्त केली होती.

मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार, मान्सूनला महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. मोसमी वाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश घेण्यास अडथळे येत असून मोसमी वाऱ्यांची गती आता मंदावली आहे यामुळे मान्सून थोडा दबकला आहे.

राज्यात मान्सूनच्या पावसाऐवजी सध्या उष्णतेचा प्रकोप (Heat Wave) बघायला मिळत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे.

काल विदर्भात (Vidarbha Heat Wave) उच्चांकी तापमानाची नोंद भारतीय हवामान विभागाने केली. शिवाय आगामी दोन दिवसासाठी विदर्भात उष्णतेचा येल्लो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.

यामुळे निश्चितच चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजाला (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला अजून काही काळ मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील जनतेला अजून काही काळ उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. शिवाय खरीप हंगामासाठी लगबग करणाऱ्या बळीराजाला देखील यामुळे नक्कीच धक्का बसला असेल.

अरबी शाखेतील नैऋत्य मोसमी पावसाला प्रवास करण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याने मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन अद्याप झालेले नसल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते गत तीन दिवसापासून मान्सून हा आपल्या शेजारील राज्यात म्हणजेच कर्नाटक मध्ये येऊन विश्रांती घेत आहे.

दुसरीकडे, बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाच्या शाखा चांगला दमदार प्रवास करत असून प्रवासासाठी पोषक वातावरण असल्याने या शाखा पूर्वोत्तर राज्यात दाखल झाल्या असून त्यांनी आता हिमालय पर्यंत मजल मारली आहे.

दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यामुळे भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर भारतात विशेषता विदर्भात आगामी दोन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. निश्चितच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस अजून काही काळ मान्सून ची वाट पाहावी लागणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts