कृषी

Panjabrao Dakh : मोठी बातमी! ऑक्टोबर मध्ये हवामान कोरडं..! पण दिवाळीमध्ये ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, पंजाबरावांचा अंदाज

Panjabrao Dakh : मित्रांनो राज्यात सध्या काही जिल्ह्यात परतीच्या पावसाची (Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, यावर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळी काळात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Monsoon) झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते राज्यात सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पाऊस (Monsoon News) झाला आहे.

मात्र असे असले तरी राज्यात पावसाचे मोठे असमान वितरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय जून महिन्यात अनेक ठिकाणी पावसाच्या आगमनाला उशीर झाला होता यामुळे खरिपातील पेरण्या लांबल्या तसेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी सारखा पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान सध्या राज्यात परतीचा पाऊस कोसळत असून याचा फायदा रब्बी हंगामाला होईल अशी आशा तज्ञांनी व्यक्त केली आहे. या दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार, ऑक्टोबर मध्ये हवामान कोरडे राहणार आहे.

ऑक्टोबर मध्ये जवळपास कुठेच पावसाची शक्‍यता नाही. मात्र असे असले तरी 14 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे. शिवाय दिवाळीत विदर्भात तसेच नाशिक जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नमूद केले आहे.

तसेच, पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना बेमोसमी पावसाचा देखील आपण तंतोतंत अंदाज देऊ आणि शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली. तसेच पंजाबराव डख यांनी थंडीला 28 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निश्चितच राज्यातून पाऊस आता माघारी गेला असून ऑक्टोबर मध्ये फार मोठा पाऊस होणार नसल्याचे डख यांनी नमूद केले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts