Monsoon Update: मान्सून (Monsoon) राज्यात दाखल झाल्यापासून शेतकरी बांधव पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहेत. खरं पाहता मान्सून 10 जून रोजी तळकोकणात दाखल झाला तर तेथून अवघ्या चोवीस तासात मान्सून (Monsoon News) राजधानी मुंबईतं आला. मात्र तद्नंतर मान्सूनची (rain) प्रगती खूपच मंदावली.
मान्सून साठी पोषक वातावरण नसल्याने राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप बघायला मिळाली. जूनचा पहिला पंधरवडा हा जवळपास पावसाविनाचं गेला. यामुळे पेरणीसाठी लगबग करणाऱ्या शेतकऱ्यांची (Farmer) काळजाची धडधड देखील वाढली.
मात्र आता हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) काहीसा दिलासा दायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून साठी पोषक वातावरण तयार होत आहे.
19 ते 21 जून या कालावधीत मान्सून हा वेग पकडणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पंधरा जिल्ह्यांना पावसाचा येलो ॲलर्ट देखील जारी केला आहे. यामुळे मान्सून ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, मानसून मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामध्ये दाखल झाला आहे. शिवाय मान्सूनने आता महाराष्ट्रातील विदर्भात देखील प्रवेश घेतला आहे. यामुळे निश्चितच शेती कामाला गती मिळणार आहे.
यंदा मान्सूनने जवळपास आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मात्र असे असले तरी मान्सून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने अजूनही राज्यात अपेक्षित असा पाऊस बघायला मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शिवाय पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने राज्यात सर्वत्र पेरणीची कामे खोळंबली आहेत.
दरम्यान हवामान विभागाने तसेच कृषी विभागाने शेतकरी बांधवांना 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले आहे. राज्याचे कृषिमंत्री दादाजी दगडू भुसे यांनी देखील शेतकरी बांधवांना शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय चाढ्यावर मूठ ठेऊ नये असे आवाहन केले आहे. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई केल्यास त्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते. यामुळे शेतकरी बांधवांचा हजारो रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता असते शिवाय पेरणी साठी केलेली मेहनत देखील व्यर्थ ठरते.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात विशेषता 19 जून पासून राज्यात मान्सून साठी परिस्थिती अनुकूल होणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देखील दिला आहे. 19 जून पासून ते 21 जून पर्यंत राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान शुक्रवारी आपल्या विदर्भातून मान्सून आता गुजरात मध्ये दाखल झाला आहे.
ऑरेंज अलर्ट रत्नागिरी : 20 ते 21 जून, सिंधुदुर्ग : 18 ते 21 जून
यलो अलर्ट : 19 ते 21 जून या कालावधीत राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे.