Monsoon Update : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला पाऊस (Rain) लवकरच महाराष्ट्रात (Maharashatra) दाखल होणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा महाराष्ट्रात सरासरी १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
जून महिन्यात (June Month) वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील.
कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या विस्तारित अंदाजानुसार दुसऱ्या आठवडय़ापासून म्हणजे १० जूनपासून पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर (west and east coasts) पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकणात (Kokan) मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग (Heavy pre monsoon rains in Konkan) तर विदर्भात सूर्यनारायणाची तुफान इनिंग नागपूर केरळात दाखल झाला आहे.
तर विदर्भवासियांना काल सूर्याने अक्षरशः होरपळून काढले. चंद्रपूरमध्ये पारा ४६ अंश पार होता. तर वर्धा आणि नागपूर येथे पारा ४५ अंश सेलिअस पलीकडे होता. त्यामुळे नवतपाच्या अखेरच्या टप्प्यात सूर्याने विदर्भातून तडाखा दाखवलाच. यंदा मार्च महिन्यापासूनच विदर्भात सूर्याचा प्रकोप जाणवत आहे.
तीन दिवसांपूर्वी विदर्भात पडलेल्या पावसाच्या सरींमुळे उष्णतेची तीव्रता कमी झाली होती. मात्र सकाळपासूनच उष्णता (Heat) जाणवत होती. घराबाहेर पडल्यानंतर चटके बसत होते. संध्याकाळी सातपर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत होत्या.