कृषी

Monsoon Update: पंजाबरावांचा सुधारित अंदाज आला रे…..! ‘या’ जिल्ह्यात आजपासून जोरदार पावसाचे आगमन; वाचा संपूर्ण डिटेल्स

Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र मोसमी पावसाची (Monsoon News) हजेरी बघायला मिळत आहे. खरं पाहता महाराष्ट्रात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाल्यानंतर जवळपास पंधरा दिवस राज्यात मौसमी पाऊस (Rain) गायब झाला होता.

मात्र तदनंतर म्हणजेच जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आणि तेव्हापासून जवळपास रोजच राज्यात पावसाचे आगमन बघायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात पेरणीच्या कामाला आता गती मिळाली आहे.

दरम्यान अजूनही राज्यातील अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. मात्र ज्या भागात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले आहे तेथील शेतकरी बांधव समाधानी असल्याचे चित्र आहे.

अशा परिस्थितीत राज्यातील काही भागातील शेतकरी बांधव अजूनही पावसाच्या जोरदार आगमनाची वाट पाहत आहेत. राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे झाली असली तरी देखील बहुतांशी शेतकऱ्यांची पेरणी बाकी असल्याने भारतीय हवामान विभाग तसेच कृषी विभागाने तरी शेतकरी बांधवांनी जमिनीची ओल तपासून तसेच शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केले आहे.

दरम्यान हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख साहेबांचा नवीन सुधारित मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) पुन्हा एकदा जाहीर झाला आहे. शेतकरी बांधव पंजाबरावांचा मान्सून अंदाज (Panjab Dakh Weather Report) जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात, अशा परिस्थितीत त्यांचा सुधारित अंदाज आज आपण पाहणार आहोत.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh) साहेबांच्या मते, राज्यात 10 जुलैपर्यंत भाग बदलत पाऊस कोसळणार आहे. यावर्षी रोजच पाऊस पडेल मात्र दररोज पाऊस भाग बदलत असणार आहे. पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. धुळे नंदुरबार नाशिक मध्ये 28, 29, 30, जोरदार पावसाची शक्यता आहे.

एकंदरीत आज पासून उत्तर महाराष्ट्रात विशेषता धुळे नंदुरबार आणि नाशिक या तीन जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पंजाबराव यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्रात दहा जुलै पर्यंत रोजच पाऊस बघायला मिळणार आहे मात्र हा पाऊस रोजच भाग बदलेल. निश्चितच पंजाबरावांचा सुधारित मान्सून अंदाज धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा फायद्याचा ठरणार असून यामुळे शेतकरी बांधव सुखावला असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळत आहे.  

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts