Monsoon Update: महाराष्ट्रात जुलै 2022 मध्ये पावसाने (Rain) अक्षरशः थैमान माजवले होते. पावसामुळे (Monsoon) राज्यातील अनेक भागात जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला होता, यामुळे राज्यातील विदर्भात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मात्र अजूनही अधून-मधून पावसाची हजेरी लागत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव, पंजाबराव डख यांनी देखील आपला सुधारित हवामान अंदाज आता सार्वजनिक केला आहे. परभणी भूमिपुत्र आणि महाराष्ट्रात हवामान अंदाजासाठी कानाकोपऱ्यात दुमदूमत असलेलं नाव पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj), आज चार जुलै रोजी राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणारं आहे. आज पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या ऑगस्ट महिन्यातील पहिल्या-वहिल्या सुधारित अंदाजानुसार, आज चार ऑगस्ट रोजी राजधानी मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक या जिल्ह्यासमवेतच राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस कोसळणार आहे. आज चार ऑगस्ट पासून ते सहा ऑगस्ट पर्यंत राजधानी मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवला आहे.
एवढेच नाही तर सात आणि आठ ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र पाऊस राहणार असल्याचा अंदाज देखील यावेळी डख यांनी वर्तवला आहे. दरम्यान पंजाबराव यांनी शेतकरी बांधवांना सल्लादेखील जारी केला आहे. पंजाबराव यांच्या मते, ज्यावेळी राज्यात पावसाची उघडीप असेल त्यावेळी शेतकरी बांधवांनी लागलीच शेतीची कामे उरकून घ्यावीत.
यामुळे शेतकरी बांधवांची शेतीची कामे खोळंबणार नसल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. एवढेच नाही तर शेतकरी बांधवांनी पिकांच्या तसेच स्वतःच्या व त्यांच्या पशुधनाच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी असे देखील यावेळी पंजाबराव यांनी नमूद केले आहे.