Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Rain) कोसळत आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. राजधानी मुंबई समवेतच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून कोसळत आहे.
यामुळे राज्यातील जनतेस मोठ्या संकटाचा समाना करावा लागत आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांची काळजाची धडधड देखील वाढली आहे. या मुसळधार पावसामुळे पिकांची नासाडी होत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधव आता पाऊस उघडण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा आता पाऊस कधी उघडतो याची वाट पाहत आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या पंजाबराव डख साहेबांचा नवीनतम सुधारीत अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) जाहीर करण्यात आला आहे.
मित्रांनो पंजाब रावांचा अंदाज (Panjab Dakh Weather Report) शेतकऱ्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरतो शिवाय पंजाब रावांच्या (Panjabrao Dakh) हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा गाढा विश्वास देखील आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधव पंजाब रावांच्या (Panjabrao Dakh News) हवामान अंदाजाकडे नेहमीच बारीक लक्ष ठेवून असतात. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाब रावांचा सुधारित अंदाज.
काय म्हणाले पंजाबराव….
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार, राज्यात 13 आणि 14 म्हणजेचं आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) कोसळणार आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना अजून काही काळ पाऊस उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे.
पंजाबराव यांच्या मते 15 जुलैपासून ते 17 जुलैपर्यंत राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळणार असून या दरम्यान सूर्य देवाचे दर्शन घडणार आहे. निश्चितचं पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार शेतकरी बांधवांना अजून काही काळ पाऊस (Monsoon News) उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार आज आणि उद्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ कोकण किनारपट्टी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सर्वत्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. राजधानी मुंबई तसेच पश्चिम घाटातील अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.