कृषी

Monsoon Update : पंजाबराव म्हणताय….! आजपासून नुसता धो-धो, या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता; वाचा पंजाबरावांचा आजचा मान्सून अंदाज

Monsoon Update : राज्यात खरं पाहता मान्सून (Monsoon) हा 10 जूनला दाखल झाला होता. सर्वप्रथम मान्सून तळकोकणात त्यानंतर अवघ्या 24 तासात मान्सून (Monsoon News) राजधानी मुंबईत दाखल झाला. यानंतर मोजून काही तासात मान्सूनने मुंबई उपनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र तद्नंतर गायब झालेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागला आहे.

भारतीय हवामान विभागाने तसेच परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आता राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत पंजाबरावांचा नवीनतम सुधारित अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधवांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या मोसमी पावसाला सुरुवात झाली असल्याने शेतकरी बांधवांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना या प्रसंगी विभागाने तसेच राज्यातील कृषी विभागाने पेरणी करण्यासाठी घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आजपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवला आहे.

काय म्हणतायत पंजाबराव डख

महाराष्ट्रात पंजाबराव डख (Panjab Dakh Weather Report) हे नाव हवामान अंदाजासाठी कानाकोपऱ्यात दुमदुमत आहे. शेतकऱ्यांचा पंजाबराव यांच्या हवामान अंदाजावर गाढा विश्वास आहे. अशा परिस्थितीत पंजाबराव यांच्या मान्सून अंदाजाकडे सध्या शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, दोन जुलै पर्यंत आता रोजच भाग बदलत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. 2 जुलैपर्यंत महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र मान्सूनचा पाऊस होणार आहे.

उद्यापासून मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढणार असून 27 तारखेपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख साहेबांनी वर्तवली आहे. आज राज्यातील काही भागात मोठा पाऊस होणार असल्याचे संकेत देखील पंजाबराव डख साहेबांनी दिले आहेत. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान पंजाबराव डख साहेबांनी शेतकरी बांधवांना पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला आहे.

हवामान विभागाने तसेच राज्यातील कृषी विभागाने देखील शेतकरी बांधवांना 100 मिलिमीटर पाऊस पडल्या शिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला आहे. राज्याचे कृषिमंत्री दादाजी दगडू भुसे यांनी शेतकरी बांधवांना पेरणीसाठी घाई करू नये अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते असे सांगितले आहे. शेतकरी बांधवांनी लवकर पेरणी केल्यास पावसाची उघडीप राहिली तर शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करावी लागू शकते यामुळे पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च तसेच लाखमोलाची शेतकरी बांधवांची मेहनत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ याची बरबादी होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी सावध पवित्रा घ्यावा आणि 100 मिलिमीटर पाऊस झाला मगच पेरणी करावी. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts