कृषी

Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज ! ‘या’ ठिकाणी ‘या’ दिवशी अतिवृष्टी होणारं, काळजी घ्या

Monsoon Update: जुलै महिन्यात पावसाने (Rain) महाराष्ट्रात मोठा हाहाकार माजवला होता. विशेषता राज्यातील विदर्भात पावसाची तीव्रता अधिक बघायला मिळाली होती. जुलै महिन्यात विदर्भात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे (Monsoon) पूरस्थिती निर्माण झाली होती.

यामुळे त्या वेळी विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र सर्व्यांनीच बघितले आहे. दरम्यान पुन्हा एकदा विदर्भात पावसाची (Monsoon News) तीव्रता वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भातील गडचिरोली भंडारा आणि इतरही अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.

हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देखील दिला आहे. यामुळे येत्या काही तासात विदर्भात पावसाची तीव्रता अजून वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा विदर्भातील जनजीवन विस्कळित होणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

अशा परिस्थितीत, भारतीय हवामान विभागाने विदर्भ वासियांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त नाव म्हणजेच पंजाबराव डख यांचादेखील सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव आणि वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, हवामानात अचानक बदल झाला असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.

परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या म्हणण्यानुसार, आज राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. राज्यात 11 तारखेपर्यंत सर्वत्र पावसाची दमदार हजेरी राहणार असल्याचे पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी नमूद केले आहे.

दरम्यान अकरा तारखे पर्यंतच्या या हवामान अंदाजात पंजाब रावांनी राजधानी मुंबई तसेच कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांच्या मते, 11 तारखेपर्यंत राजधानी मुंबई तसेच नाशिक, पुणे व दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार आहे.

यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील पंजाब राव यांनी केले आहे. 11 तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस कोसळणार असून हा पाऊस विजांच्या कडकडाटासह कोसळणार असल्याने शेतकरी बांधवांनी पावसाचे वातावरण तयार होताच आपले घर जवळ करावे.

तसेच कोणीही पावसामध्ये बाहेर पडू नये असे आवाहन यावेळी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नागरिकांना केले आहे. पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना, आपल्या पिकांची तसेच आपली व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी केली आहे. निश्चितच 11 ऑगस्ट पर्यंत राज्यात पुन्हा एकदा जनजीवन विस्कळित होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts