Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची (Rain) संततधार सुरूच आहे. दुसऱ्या फेरीत ला मान्सून (Monsoon) राज्यात थैमान घालत असल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर गेल्या काही दिवसांपासून पावसाचे (Monsoon News) विक्राळ स्वरूप बघायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तसेच सांगली सातारा घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिक पूर्णतः पाण्याखाली गेली असून पिकांची नासाडी होत आहे. मात्र मराठवाड्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोकणातील दक्षिण कोकणात विशेषत सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र अधूनमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे.
राजधानी मुंबई तसेच इतर कोकणातील जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून सातारा रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचे सावट कायमच आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत असल्याने पिकांची नासाडी झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर या पाच जिल्ह्यात पावसाची उघडीप झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यामुळे निश्चितच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सांगली आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे इतर पिकांचे नुकसान होत असले तरी भात उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या पंजाब रावांनी देखील आपला हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) सार्वजनिक केला आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज 11 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. 15 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप राहणार असल्याचे पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी नमूद केले आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपली शेतीची कामे करून घ्यावीत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले असल्याने शेतकरी बांधवांनी आता पीक व्यवस्थापनाची कामे करावीत असा सल्ला पंजाब रावांनी (Panjabrao Dakh News) दिला आहे.
15 ऑगस्ट पर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे मात्र 15 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाचे वातावरण तयार होणार आहे. 17 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सऱ्या कोसळणार असल्याचा अंदाज पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे.