Weather Update: चातकाप्रमाणे मान्सूनची (Mansoon 2022)वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department)एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो या वर्षी केरळमध्ये मान्सूनचे (Mansoon In Kerala) वेळेआधीच आगमन झाले आहे.
दरवर्षी एक जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून गतवर्षी 3 जूनला दाखल झाला होता मात्र यावर्षी मान्सूनने केरळमध्ये तीन दिवस लवकर धडक मारली. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या असून सामान्य जनतेचे देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
आता, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताजा अपडेट नुसार, मान्सून येत्या दोन दिवसात कोकणात (Konkan Mansoon) थाटामाटात आगमन करणार आहे. खरे पाहता, दरवर्षी मान्सून महाराष्ट्राच्या तळकोकणात सात जूनच्या आसपास शिरकाव करत असतो. मात्र यावर्षी तब्बल चार दिवस आधी मान्सून कोकणात दाखल होणार आहे.
यामुळे मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कोकणवासीयांची तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेची प्रतीक्षा आता संपणार असून महाराष्ट्रात लवकरच मान्सूनचे आगमन आता होणार हे ठरलेलंच आहे.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मान्सून आगेकूच करत कर्नाटकात गेला या ठिकाणी मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सून हा लवकरच गोव्यात आणि तळकोकणात म्हणजेच दक्षिण कोकणात दाखल होणार आहे.
यामुळे तळकोकण वासियांना लवकरच मान्सून बघायला मिळू शकतो मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने मुंबईकरांना मान्सून साठी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सून मुंबईमध्ये दहा जून नंतरच दाखल होणार आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडा उशिरा मान्सूनच्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायला मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे की या वर्षी मान्सून हा दमदार राहणार आहे. देशातील बहुतांशी भागात मान्सूनचा समाधानकारक पाऊस बघायला मिळणार आहे. यंदा 106 टक्के पाऊस अपेक्षित असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारताच्या उत्तर पूर्व भागात सरासरीपेक्षा पाऊस हा कमी राहणार असा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
देशात या वर्षी संपूर्ण मान्सून हंगामात आधी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा अधिक पाऊस होणार असल्याची शक्यता आता वर्तवली जातं आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, या मान्सून हंगामात सरासरी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 103 टक्के असण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने एप्रिलमध्ये सांगितले होते की, देशात सामान्य पाऊस पडेल जो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 99 टक्के असेल. मात्र आता सुधारित अध्ययनानंतर आणि मान्सूनसाठी तयार झालेल्या पोषक वातावरणामुळे मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 103 टक्के राहण्याची शक्यता निश्चितच संपूर्ण देशातील शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बाब आहे.