Mushroom Farming: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काहीतरी वेगळं करावच लागत. जर आयुष्यात बदल केला तर या जगात काहीचं शक्य नाही. मित्रांनो शाहरुख खान म्हणतो अगर किसी चीज को शिद्दत से चाहे तो पुरी कायनात उसे मिलाने मे जूट जाती है, अगदी हिच गोष्ट खरी करून दाखवली आहे केरळमधील (Kerala) एका माय लेकाने.
या माय लेकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर शेती क्षेत्रात (Agriculture) एक नवीन कामगिरी (Successful Farmer) केली आहे. केरळच्या जीतू थॉमस आणि त्याची आई लीना थॉमस यांनी मशरूम शेतीतून (Mushroom Cultivation) लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची (Farmer) किमया साधली आहे.
या माय लेकाने दिवसाला एक पॅकेट घेऊन मशरूमची (Mushroom) शेती सुरू केली. आता मशरूम शेतीच्या कामाला 4 वर्षे झाली आहेत, अन आज हे माय-लेक मशरूमच्या लागवडीतून दिवसाला 40 हजार कमवत आहेत. लोक महिन्याला 40 हजार कमवण्यासाठी बारा तास काबाडकष्ट करत असतात मात्र हे मायलेक दिवसाला 40 हजार कमवण्याची किमया साधत आहेत.
मित्रांनो जीतू थॉमस यांनी भौतिकशास्त्रात बॅचलर डिप्लोमा आणि सोशल वर्कमध्ये डिप्लोमा केला आहे. काही वर्षांपूर्वी ते एका एनजीओमध्ये सामाजिक उद्योजक म्हणून काम करत होते. त्यावेळी मशरूम शेतीचा विचार करणे शक्य नव्हते. काही काळानंतर, शेतीच्या सर्व शक्यता जाणून घेण्यासाठी, जीतूने एक पूर्ण विकसित शेतकरी होण्याचे ठरवले आणि विचार केला की आजूबाजूच्या परिसरात मशरूम विकून किती पैसे कमावता येतील, आपण प्रयत्न करूया.
यावेळी जीतू थॉमस केवळ 19 वर्षांचा होता आणि त्याने आई लीना थॉमस यांच्यासोबत मशरूमची शेती सुरू केली. मशरूम लागवडीपूर्वी, जीतूने बरेच ऑनलाइन संशोधन केले आणि 1 दिवसीय कार्यशाळेत देखील भाग घेतला. एक दिवसीय कार्यशाळेत मशरूम वाढवण्याचे सोपे मार्ग आणि जास्त उत्पन्न देणारी शेती याविषयी शिकवण्यात आले. जीतूने शास्त्रोक्त पद्धतींचा वापर करून अल्पावधीत मशरूम शेतीतुन जास्त कमाई करण्याचे गुण शिकले.
जीतू आणि त्याची आई कोरोना संकटकाळातही कोणताही तोटा न करता व्यवसाय करत राहिले आणि संकटातून बाहेर आले. मशरूमच्या लागवडीत हवामान आणि तापमान महत्त्वाची भूमिका बजावतात. जीतू आणि त्याची आई कोरोना संकटकाळातही कोणताही तोटा न करता व्यवसाय करत राहिले आणि संकटातून बाहेर आले. मशरूमच्या लागवडीत हवामान आणि तापमान महत्त्वाची भूमिका बजावतात. जीतू थॉमस आणि त्याच्या आईने मशरूम शेतीत 4 वर्षांनी चांगली कमाई सुरु केली आहे.
लीना थॉमस यांच्या मते, त्यांनी मशरूमची शेती 2012 मध्ये सुरू केली होती. सध्या जीतू आणि लीना दररोज 200 किलो मशरूमची लागवड करण्यास सक्षम आहेत. एर्नाकुलम जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त किरकोळ दुकानांवर तो त्याचे मशरूम विक्रीसाठी वितरीत करतो. लीनाच्या मशरूम फार्ममध्ये महिन्याला 2 टन मशरूम तयार करण्याची क्षमता आहे. खाद्य आणि औषधी मशरूमचे उत्पादन वाढवण्यासाठी ते नवनवीन उपाययोजना करत असतात. निश्चितच या मायलेकांनी मशरूम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमाई करून इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श रोवला आहे.