Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. ही योजना दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते.
आतापर्यंत शेतकऱ्यांना 15 हप्ते वितरित झाले आहेत. पंधरावा हफ्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी वितरित करण्यात आला होता. दरम्यान, आता शेतकऱ्यांना सोळाव्या हफ्त्याचे वेध लागले आहे. हा सोळावा हफ्ता फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
जे शेतकरी केवायसी पूर्ण करतील त्यांनाच या योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण पीएम किसान योजनेसाठी केवायसी करण्याची सर्वात सोपी पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ई केवायसी करण्याची सोपी पद्धत
शासनाने आता शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी केवायसीसाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. आता शासनाने फेस ऑथेंटिकेशन आधारित ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी नवीन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. पीएम किसान मोबाईल एप्लीकेशन हे नवीन ॲप्लिकेशन शासनाने तयार केले असून या एप्लीकेशनच्या मदतीने आता घरबसल्या अगदी दोन मिनिटात केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
विशेष म्हणजे ही केवायसीची प्रक्रिया चेहरा दाखवून पूर्ण करता येणार आहे. म्हणजेच यासाठी आता ओटीपीची किंवा फिंगरप्रिंट बायोमेट्रिकची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे या ॲप्लिकेशनच्या मदतीने दुसऱ्या शेतकऱ्यांची देखील केवायसी करता येणार आहे. एक शेतकरी या एप्लीकेशनच्या मदतीने इतर शंभर शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करू शकणार आहे.
म्हणजे या ॲप्लिकेशनचा वापर करून इतर शेतकऱ्यांची देखील मदत करता येणार आहे. तसेच राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना या ॲप्लिकेशनचा वापर करून 500 शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करता येईल असे सांगितले जात आहे. हे एप्लीकेशन प्ले स्टोअरवर निशुल्क उपलब्ध आहे.
तुम्ही प्ले स्टोर वर पीएम किसान योजना असे नाव सर्च करून हे एप्लीकेशन डाउनलोड करू शकता. किंवा https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan या लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. हे एप्लीकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध आहे.
ऑनलाइन केवायसी कशी करणार
तुम्ही एप्लीकेशन सोबतच पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील केवायसी पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला केवायसी पूर्ण करता येणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
येथे गेल्यानंतर तुम्हाला ई-केवायसी चा पर्याय दिसणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि त्यानंतर आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. एवढे केल्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या रकान्यात तुम्हाला टाकावा लागेल. एवढे केले की तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.