Okra Farming : भारतात भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत भाजीपाला पिकांची शेती (Vegetable Farming) शेतकऱ्यांना लाखों रुपये कमवून (Farmer Income) देत आहे. भेंडी (Okra Crop) हे असेच एक भाजीपाला पीक आहे.
भेंडीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. अशा परिस्थितीत या भाजीपाला पिकाचे बाजारात मोठी मागणी असते आणि याला चांगला बाजार भाव देखील मिळतो. उन्हाळ्यात मिळणाऱ्या या भाजीत भरपूर पोषक घटक असतात. हे जीवनसत्त्वे, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोहाने समृद्ध असते.
भेंडीची योग्य वेळी योग्य जमिनीत लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. जाणकार लोक सांगतात की जर शेतकरी बांधवांनी भेंडीच्या सुधारित जातींची (Okra Variety) शेती केली तर निश्चितच त्यांना चांगली कमाई होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण भेंडीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
भेंडीच्या सुधारित जाती
पुसा ए-४ – ही सुधारित जात पिवळ्या शिरा मोझॅक विषाणूंसह ऍफिड आणि जॅसिड यांसारख्या कीटकांना प्रतिरोधक आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची आणि किंचित फिक्कट रंगाची असतात. या जातीची भेंडी कमी चिकट देखील असते. ही जात पेरणीनंतर साधारण 50 दिवसांनी फळ देण्यास सुरुवात करते.
परभणी क्रांती – भेंडीची ही जात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लावली जाते. पीत रोगाशी लढण्यास ही जात सक्षम आहे. या जातीच्या बिया लावल्यानंतर सुमारे 50 दिवसांनी फळे येऊ लागतात. या जातीची भेंडी गडद हिरव्या रंगाची आणि 15-18 सें.मी. लांब असते.
पंजाब-7 – भेंडीची ही सुधारित जात देखील पीत रोग विरोधी आहे. या जातीच्या भेंडीचा रंग हिरवा आणि भेंडी मध्यम आकाराची असून बिया पेरल्यानंतर 55 दिवसांनी फळे येऊ लागतात.
अर्का अभय – भेंडीची ही जात येलो मोझॅक व्हायरस रोगापासून स्वतःचा बचाव करण्यास सक्षम आहे. या जातीची भेंडीची झाडे 120-150 सेमी उंच आणि सरळ असतात.
अर्का अनामिका – ही जात यलो मोज़ेक विषाणू रोगापासून स्वतःचा बचाव करण्यास सक्षम आहे. रोपांची लांबी 120-150 सें.मी. आणि या भेंडीच्या झाडाला अनेक शाखा असतात. या जातीची भेंडी मऊ असते. हे वाण उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूसाठी योग्य आहे.
वर्षा उपहार – यलो मोझॅक विषाणू रोगास प्रतिरोधक असलेल्या भेंडीच्या या जातीच्या वनस्पती 90-120 सेमी उंच आणि एकमेकांत गुंफलेल्या असतात. यामध्ये प्रत्येक नोडमधून 2-3 फांद्या निघतात. त्याची पाने गडद हिरव्या रंगाची असतात आणि पावसाळ्यात पेरणीनंतर सुमारे 40 दिवसांनी फुले दिसायला लागतात.
हिसार उन्नत – पावसाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूसाठी उपयुक्त असलेल्या या प्रकारच्या भेंडीच्या वनस्पती 90-120 सें.मी. लांब असतात आणि यामध्ये इंटरनोड्स जवळ असतात आणि प्रत्येक नोडमधून सुमारे 3-4 शाखा बाहेर पडतात. भेंडीची ही जात 47 दिवसांत काढणीसाठी तयार होते.
VRO-6 – भेंडीच्या या जातीला काशी प्रगती असेही म्हणतात. ही जात पिवळ्या मोझॅक विषाणू रोगास प्रतिरोधक आहे. या जातीची झाडे पावसाळ्यात 175 सेमी पर्यंत वाढतात. आणि उन्हाळी हंगामात सुमारे 130 सें.मी. लांब असतात. यात पण जवळ-जवळ इंटरनोड असतात. या जातीमध्ये फुले लवकर येतात. पेरणीनंतर 38 दिवसांनी फुले येतात.
पुसा सावनी – उन्हाळा आणि पावसाळ्यासाठी उपयुक्त, या जातीच्या भेंडीची लांबी सुमारे 100-200 सेमी असते. या जातीची फळे गडद हिरव्या रंगाची असतात. सहसा या जातीला यलोवेन मोझॅक विषाणू रोग देखील होत नाही.
पुसा मखमली – या जातीच्या भेंडीच्या फळांचा रंग हलका हिरवा असतो, परंतु ही जात यलोवेन मोझॅक व्हायरसला प्रतिरोधक नसते. या भेंडीला 5 पट्टे असतात आणि ही त्याची खासियत आहे. त्याची फळे 12 ते 15 सें.मी. लांब असतात.