अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली असून त्याचा परिणाम बाजार समितीतील कांदा दरावर होत दरात मोठी घट झाली आहे.
कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्या कारणामुळे कांद्याचे दर हे स्थिर राहत नाहीत. पण गेल्या तीन महिन्यापासून आवक वाढूनही मागणी असल्याने कांद्याचे दर घसरले नव्हते.
मात्र आता परिस्थिती बदलली असून चाकण बाजार समितीमध्ये मागील 10 दिवसात प्रति किलो कांद्याच्या दरात घट झाल्याचे चित्र दिसत आहे.
चाकण चा बाजार समितीमध्ये मागील 10 दिवसात कांद्याचा दर हा प्रति किलो तब्बल 14 रुपयांची घट झाली आहे. तर गुरुवारी दरामध्ये अजून 10 ते 12 रुपयांनी घट झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.
सर्व बाजारपेठांमध्ये सध्या हंगामातील कांद्याची आवक ही वाढली आहे. त्यात आता उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागल्याने बाजार समित्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे.
त्यात होळी सणामुळे बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा विक्री विना तसाच पडून आहे.सणामुळे परप्रांतीय मजूर हे गावी परतले आहेत.
त्यामुळे मजूरांची संख्या ही कमी असल्याने कांद्याची पोती खाली-वर घेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.