अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सीताफळाच्या बागाची छाटणी पुर्ण होऊन उन्हाळ्याच्या सुरवातीला नवीन बहार सीताफळाच्या बागानी धरला आहे. पण फुटणाऱ्या कोवळ्या फुटीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने त्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार आहे.
सीताफळीच्या बागाचा बहार छाटणीनंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरला जातो. तर बहरातील काढणी ही जुलै-ऑगस्टच्या दरम्यान असते.
पण सध्या छाटणी केल्यापासून ते फळपिकाची लागवड होईपर्यंत योग्य व्यवस्थापन केले तर रोग नियंत्रण होऊन उत्पादन वाढीत भर पडण्यास मदत होणार आहे.
सीताफळाच्या सध्या छाटणी पूर्ण झाली आसून बागांना नवीन कोवळ्या फुटी फुटण्यास सुरूवात झाली आहे.पण या कोवळ्या फुटीवर मावा, फुलकिडे, तुडतुडे अशा रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून लागला आहे.
ही किडे पाने, कोवळ्या फांद्या एवढेच नाही तर कोवळी फळे यातूनही रस शोषून घेतात. त्यामुळे त्याचा परिणाम हा सीताफळीवर होत आसून पानांची वाढ खुंटते शिवाय फळांचा आकार हा वेडावाकडा होत आहे.
फळांची व्यवस्थित वाढ होत नाही याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. सीताफळाच्या झाडांची छाटणी पूर्ण झाली की या झाडांवर लागलीच एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करून घेणे गरजेचे आहे.
शिवाय झाडाच्या मुख्य खोडावर जमिनीपासून अडीच फूटावर 1 किलो चुना, 1 किलो मोरचूद प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून लावावी लागणार आहे.
प्रति लिटर पाण्यामध्ये डायमिथोएट 2 मिली, मॅन्कोझेब 2 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम याचे मिश्रण करुन त्याची फवारणी केल्यास नवीन कोवळ्या फुटीवर मावा, फुलकिडे, तुततुडे यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आळा घालता येतो.