कृषी

Panjabrao Dakh : दिलासादायक ! आजपासून पावसाची उघडीप ; पण ‘या’ दिवशी कोसळणार जोरदार ; पंजाब रावांचा इशारा

Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) चांगलाच बसत असून खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने पावसाचा (Monsoon Rain) जोर ओसरला असल्याची भविष्यवाणी केली होती. मात्र महाराष्ट्रात अजूनही पाऊस (Monsoon) सुरूच आहे. परतीचा पाऊस (Monsoon News) राज्यात चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान माजवले असून अनेक ठिकाणी ढग फुटी सदृश्य पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. उर्वरित ठिकाणी मात्र पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात

विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे सदर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी केले जात आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज पासून राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे.

आजपासून हवामान क्लियर होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच थंडीचा जोर देखील राज्यात वाढणार असल्याचे पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी नमूद केले आहे. मात्र असे असले तरी स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे.

याशिवाय पंजाबराव यांच्या मते 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता बनत आहे. निश्चितच राज्यात आता थंडीचा मौसम सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी स्थानिक वातावरण होऊन कोसळत असलेल्या पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगलाच नुकसानदायी सिद्ध होत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts