Panjabrao Dakh : राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी, राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Monsoon) कोसळत आहे.
भारतीय हवामान विभागाने आज पासून चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आगामी चार दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची (Monsoon News) शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज देखील भारतीय हवामान विभागाने पावसाची (Maharashtra Rain) शक्यता वर्तविली असून आज राज्यातील धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी महाराज नगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विशेषता शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज(Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे.
आज 27 सप्टेंबर पासून ते 4 ऑक्टोबर पर्यंत राज्यात अनेक जिल्ह्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्रात रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. या कालावधीत बरसणारा पाऊस हा मोठा नसणार मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र राहणार आहे.
चार ऑक्टोबर पर्यंत राज्यातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, वाशीम, छत्रपती संभाजी महाराज नगर, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यात रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रातून अलविदा घेणार आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तसेच सप्टेंबर महिन्यातील दुसरा आठवड्यात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे राज्यातील सर्व प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामात पावसाची कमतरता भासणार नसल्याचे जाणकार नमूद करत आहेत.
दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता परिणामी शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.
दरम्यान अतिवृष्टी बाधित शेतकरी बांधवांना राज्य शासनाने मदत देखील जाहीर केली आहे. राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला मदतीची रक्कम देखील सुपूर्द केली जात आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.