कृषी

Panjabrao Dakh : ब्रेकिंग! आज ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टी होणार! पंजाबराव यांचा इशारा

Panjabrao Dakh : राज्यात सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा काही ठराविक भाग वगळता सर्वत्र पावसाची (Rain) उघडीप बघायला मिळाली. मात्र असे असले तरी काही राज्यातील काही भागात पावसाचे (Monsoon) सत्र सुरू आहे.

दरम्यान राज्यातील अनेक भागात शेतकरी बांधव पावसाची (Monsoon News) आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेषता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाची (Maharashtra Rain) नितांत आवश्यकता आहे. मराठवाड्यात खरीप हंगामातील पिके होरपळत असल्याचे दृश्य आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) आज गुरुवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवला आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार (Weather Update) आज 8 सप्टेंबर गुरुवारी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीमहाराजनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

तसेच भारतीय हवामान विभागाच्या मते आज विदर्भात देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. निश्चितच मराठवाडा मध्ये देखील पावसाची शक्यता असल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान पंजाबराव डख यांनी देखील आपला हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) सार्वजनिक केला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांच्या मते आज पासून राज्यात अतिवृष्टी होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पासून दहा सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांच्या मते,18 सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस कोसळणार असून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे. तसेच 18 सप्टेंबर पर्यंत कोसळणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह कोसळणार असून अनेक ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी यादरम्यान आपली व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन पंजाबराव यांनी केले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts