कृषी

Panjabrao Dakh : मोठी बातमी! हवामानात अचानक झाला बदल! ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा पंजाबरावांचा संपूर्ण अंदाज

Panjabrao Dakh : गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा वरुणराजाचे (Rain) आगमन झाले आहे. मित्रांनो खरे पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र पाऊस (Maharashtra Rain) होता.

त्यामुळे राज्यात अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आणि शेतकरी बांधवांना (Farmer) हजारो रुपयांचा फटका देखील बसलेला आहे.

मात्र ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाच्या (Monsoon) कमतरतेमुळे तसेच उष्णतेत वाढ झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके होरपळली जात होती.

दरम्यान राज्यात 31 ऑगस्ट अर्थात गणेश चतुर्थीच्या दिवशी पावसाला (Monsoon News) सुरुवात झाली आहे. दरम्यान पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी 31 ऑगस्ट पासून पावसाची शक्यता वर्तवली असल्याने पंजाबराव यांचा अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) तंतोतंत खरा ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यामुळे शेतकरी बांधव पंजाबराव यांच्या हवामान अंदाजाकडे (Panjabrao Dakh Weather Report) मोठे बारीक लक्ष लावून आहेत. अशा परिस्थितीत आज आपण पंजाब रावांनी जारी केलेला त्यांचा नवीन सुधारित अंदाज जाणून घेणार आहोत. मित्रांनो पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात सहा सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता कायम आहे.

राज्यातील पूर्व विदर्भ, मराठवाडा तसेच पश्‍चिम महाराष्ट्र आणि खानदेश मधील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या मते राज्यातील सांगली, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, सातारा, बीड या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. निश्चितच मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता असल्याने तेथील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पिके मराठवाड्यात अक्षरशः होपळत असल्याचे दृश्य आहे. मात्र पंजाब रावांचा अंदाज जर खरा ठरला तर निश्चितच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts