कृषी

Panjabrao Dakh : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, पावसाची जोरदार बॅटिंग होणार…! पंजाबरावांचा इशारा

Panjabrao Dakh : राज्यात महिन्याच्या सुरवातीला पावसाची (Monsoon) सुरवात झाली होती मात्र आता पुन्हा एकदा पावसाची (Monsoon News) उघडीप असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने संततधार सुरू केली आहे.

असे असले तरी मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही पावसाने (Rain) उघडीप दिली असल्याने खरीप हंगामातील पिके अक्षरशः होरपळत असल्याचे दृश्य आहे. यामुळे सध्या मराठवाड्यातील शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

मात्र तूर्तास तरी मराठवाड्यात पावसाची (Maharashtra Rain) शक्यता नसल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आपल्या सुधारित अंदाजात पुढील पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये मराठवाड्याचा देखील समावेश असल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित असलेले व्यक्तिमत्व पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होत आहे.

या सुधारित हवामान अंदाजानुसार 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. पंजाब रावांनी दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, महाराष्ट्रात 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळणार आहे. यामुळे निश्चितच राज्यातील काही भागात शेतकरी बांधवांना काळजी घ्यावी लागणार आहे.

पंजाबरावांच्या मते, 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांना या कालावधीत अधिक सजग राहण्याचे आवाहन देखील पंजाबराव यांनी केले आहे. मित्रांनो खरे पाहता 31 ऑगस्ट राज्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. 31 ऑगस्ट म्हणजे गणरायाच्या आगमनाच्या दिवशी राज्यातील अनेक भागात पाऊस झाला. मात्र तदनंतर राज्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याचे चित्र आहे. यामुळे सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts