कृषी

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा अंदाज आला रे…! ‘या’ दिवशी महाराष्ट्रातून निरोप घेणार मान्सून, ‘या’ तारखेपर्यंत कोसळणार धो-धो पाऊस

Panjabrao Dakh : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी देखील राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस कोसळत आहे. काल नाशिक जिल्ह्यातील सटाणा तसेच कळवण परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) झाला आहे. याव्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची (Monsoon News) हजेरी बघायला मिळत आहे. नाशिक शिवाय राज्यातील इतरही जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, राज्यात 2 ऑक्टोबर पर्यंत सर्वत्र पावसाची शक्यता आहे. मात्र असे असले तरी या कालावधीत भाग बदलत पाऊस कोसळणार आहे.

यादरम्यान नाशिक जिल्ह्यातही पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. याशिवाय पंजाबराव डख यांनी परतीच्या पावसाबाबत देखील महत्वपूर्ण माहिती शेतकरी बांधवांना आपल्या हवामान अंदाज दिली आहे.

पंजाबराव डख यांच्या मते, 6 ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. शिवाय राज्यात 28 ऑक्टोबर पासून जोरदार स्वरूपाची थंडी पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात केवळ दोनच मोठे पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत आगामी काही दिवसात परतीच्या पावसाला सुरुवात होणार असून 28 तारखेपासून राज्यात जोरदार स्वरूपाची थंडी देखील बघायला मिळणार आहे.

दरम्यान दोन ऑक्टोबर पर्यंत राज्यात भाग बदलत मोठा पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी दोन तारखेपर्यंत कांदा बियाणे पेरणी थांबवुनन घ्यावी असा सल्ला देखील यावेळी डख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसारख्या पावसामुळे तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली आहेत.

यामुळे भविष्यात पाण्याची चणचण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना भासणार नसल्याचे जाणकार नमूद करत आहेत. मात्र जास्तीच्या पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts