कृषी

Panjabrao Dakh : आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आज कोसळणार धो-धो पाऊस ; पंजाबराव डख यांचा इशारा

Panjabrao Dakh : महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाचा (Rain) अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात परतीचा पाऊस (Maharashtra Rain) चांगलाच बरसत आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अद्ययावत माहितीनुसार आज देखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची (Monsoon) शक्यता आहे. मित्रांनो, आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची (Monsoon News) शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे.

या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील यावेळी जाणकार लोकांकडून केले जात आहे. मित्रांनो सध्या कोसळत असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीन काढणी प्रगतीपथावर आहे. अशा परिस्थितीत परतीचा पाऊस कोसळत असल्याने शेतकरी बांधवांचे सोयाबीन वावरातच कुजत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे.

आधीच अतिवृष्टीमुळे त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांना परतीच्या पावसामुळे नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. दरम्यान, परभणी भूमिपुत्र हवामान तज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये एक मोठं विश्वासाचं नाव पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात आजचा दिवस पावसाची दाट शक्यता आहे.

पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार आज 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, कोकण, सातारा, सांगली, आटपाडी, राहुरी, अहमदनगर दक्षिन, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, नांदेड या भागात पावसाची दाट शक्यता आहे. मित्रांनो पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या कालच्या आपल्या सुधारित हवामान अंदाजात वर्तवलेला अंदाज 100% खरा ठरला असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

काल राहुरी मध्ये पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले होते. आणि राहुरी तालुक्‍यात काल अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. यामुळे पंजाबराव डख यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आज देखील अहमदनगर मध्ये अहमदनगर दक्षिण आणि राहुरी भागात पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. आजच्या दिवस पावसाची शक्यता असल्याने निश्चितच शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी जाणकार लोकांकडून केले गेले आहे. उद्यापासून राज्यात पावसाची उघडीप राहणार असून थंडीचा जोर वाढेल असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts