कृषी

Panjabrao Dakh : मोठी बातमी! पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा, आता ऑक्टोबर महिन्यात ‘या’ दिवशी कोसळणार पाऊस, पंजाबरावांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh : मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी (Farmer) हवामानाचा अंदाज (Weather Update) अतिशय महत्वाचा ठरतो. हवामानाचा अंदाजाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपल्या शेतीकामाचे नियोजन करता येते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव हवामान विभागाचा अंदाज (IMD) घेत असतात. याशिवाय शेतकरी बांधव पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावर (Panjabrao Dakh Havaman Andaj) देखील मोठा गाढा विश्वास ठेवत असतात.

मित्रांनो पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेला हवामान अंदाज आता तंतोतंत खरा ठरत आहे. काल राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा पंजाबरावांचा अंदाज खरा ठरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात काल पावसाची (Rain) हजेरी पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांमध्ये पंजाबरावांच्या हवामान अंदाजा (Panjab Dakh Weather Report) विषयी चर्चा रंगल्या आहेत.

यामुळे आज आपण ऑक्टोबर महिन्यात पंजाबराव यांनी वर्तवलेला हवामान अंदाज घेऊन हजर झालो आहोत. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या ऑक्टोबर महिन्यातील हवामान अंदाजानुसार, आजपासून 13 तारखेपर्यंत राज्यात पाऊस (Monsoon) कोसळणार आहे. आज पासून (Monsoon News) नऊ तारखेपर्यंत राज्यात मुंबई, नाशिक, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, कोल्हापूर, या भागात पाऊस कोसळणार आहे.

तसेच 9 आणि 10 ऑक्‍टोबर रोजी राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, सोलापूर तसेच अहमदनगर या जिल्ह्यात पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. याशिवाय 10 ऑक्टोबर 13 ऑक्टोबर या दरम्यान नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. याशिवाय या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मुंबई, दक्षिण महाराष्ट्र या विभागात देखील पावसाची शक्यता आहे. मित्रांनो राज्यात सध्या खरीप हंगामातील शेती पिकांची काढणी सुरू आहे.

अशा परिस्थितीत पंजाब रावांनी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी बांधवांना आपल्या शेतमालाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची काढणी झाल्याबरोबर शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवला पाहिजे. तसेच शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपल्या पशुधनाची तसेच आपली देखील काळजी घेणे अपरिहार्य आहे. एकंदरीत, काल पंजाब रावांनी पावसाची शक्यता असल्याचे सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर कालचा पंजाबरावांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात राज्यात पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपल्या शेतीची कामे केली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मते, पंजाब रावांचा अंदाज त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts