Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Rain) चांगलाच बरसत आहे. राज्यातील परतीचा पाऊस (Monsoon) जवळपास सर्वत्र पाहायला मिळत असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा (Monsoon News) जोर अधिक पाहायला मिळत आहे.
मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. नाशिक कोल्हापूर पुणे यांसारख्या जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पीकांची राखरांगोळी झाली आहे. खानदेशात देखील परतीचा पाऊस चांगलाच कहर आणत असून खानदेशातील कापसाचे पीक धोक्यात आले आहे.
सध्या कापूस पीक हार्वेस्टिंगच्या अवस्थेत असताना परतीचा पाऊस पडला असल्याने वावरातच कापसाच्या वाती तयार झाल्या आहेत. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे तर दुसरीकडे शेत मालाला बाजारात अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे वाटोळे होत आहे.
एकंदरीत काय अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजाचे कंबरडे मोडले जात आहे. आज देखील भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. काल कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची चांगली हजेरी पाहायला मिळाली होती.
यादरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज राज्यात पाऊस कोसळणार असून उद्यापासून पावसाची उघडीप राहणार आहे. पासून राज्यात सर्वत्र थंडीला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्रात आज पासून आज थंडी जाणवू लागणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आता आपले सोयाबीन आणि मका पीक हार्वेस्टिंग करून घ्यावे आणि सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे किंवा बाजारात विक्रीसाठी न्यावे.
तसेच पंजाब रावांनी 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज गेल्या काही दिवसांपूर्वी दिला आहे. त्यामुळे द्राक्ष पट्टा असलेल्या या भागातील शेतकरी बांधवांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन यावेळी केले जात आहे.