Panjabrao Dakh : मित्रांनो राज्यात पावसाची (Rain) सध्या उघडीप पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आज राज्यात पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, आज राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पावसाची (Maharashtra Rain) शक्यता आहे.
या संबंधित विभागाला भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट (Rain Alert) देखील जारी झाला आहे. यामुळे निश्चितच संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी चिरपरिचित व्यक्तिमत्व तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये विश्वासू हवामान तज्ञ म्हणून ओळख कमावलेले पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.
पंजाब राव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे. पंजाब राव (Panjabrao Dakh News) यांनी देखील भारतीय हवामान विभागाप्रमाणेचं राज्यात पावसासाठी (Monsoon) पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती दिली आहे. मित्रांनो पंजाबराव यांनी वर्तवलेलं हवामान अंदाजानुसार आज पासून 9 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील नाशिक, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
तसेच 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा, सातारा, सांगली, सोलापूर व अहमदनगर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची (Monsoon News) शक्यता आहे. एवढेच नाही या कालावधीत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मुंबई, दक्षिण महाराष्ट्र तसेच नाशिक जिल्ह्यात देखील पाऊस कोसळणार आहे.
निश्चितच पंजाबराव टाकत तसेच भारतीय हवामान विभागाने आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबराव डख यांनी जवळपास 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आपली आपल्या पशुधनाची घेतली पाहिजे. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील पिकांची काढणी केली असेल त्यांनी आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवणे देखील आवश्यक आहे.